आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • North India Suffers From Severe Winter, Heavy Fog, Railway, Road Traffic Affected

उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला, दाट धुक्यामुळे विमान, रेल्वे आणि रस्ता वाहतुकीवर गंभीर परिणाम

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

चंदिगड : गेल्या काही दिवसांपासून वायव्य भागात तीव्र थंडी व धुक्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजून काही दिवस तरी थंडी व दाट धुक्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील दोन दिवस अनेक ठिकाणांवर दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणातील पोलिसांना तसेच संबंधित विभागांना चालकांना याबाबत सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यानंतरही रस्ते अपघातांत वाढ होत आहे.

रविवारी लुधियानाजवळ अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दशकांनंतर पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा गरीब आणि खालच्या भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम झाला आहे. परंतु तीव्र थंडीच्या काळात पडणाऱ्या धुक्यामुळे गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. बाजारपेठांमध्ये, मंडी, गल्ली-मोहल्ल्यांमध्ये शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करण्यात येत आहे. वाढणाऱ्या थंडी गव्हाच्या पिकाला फायदेशीर ठरणार आहे. जेवढी थंडी वाढेल, तेवढे जास्त गव्हाचे उत्पादन होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र डॉक्टरांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. रामसरूप, बलबीर, दलजित या शेतकऱ्यांनी सांगितले, दाट धुके गव्हाच्या पिकासाठी फायदेशीर आहे. जे‌वढी जास्त थंडी असेल, तेवढा गव्हाच्या पिकाला फायदा होईल. हरियाणातील नारनोलमध्ये पारा एक अंशावर आला.

उत्तर भारतात असे होते प्रमुख शहरांतील तापमान

हिस्सार, अंबाला, भिवानीचा पारा सहा अंश, करनाल तथा रोहतक सात अंश, सिरसा पाच अंश, अमृतसर पाच अंश, लुधियाना आणि पतियाळा सात अंश, पठाणकोट आठ अंश, भटिंडा चार अंश, आदमपूर ८ अंश आणि चंदिगडमध्ये पारा ९ अंशांवर पोहोचला. दिल्ली आठ अंश, श्रीनगर शून्य अंश तर जम्मूचा पारा सहा अंशांवर आला. हिमाचल प्रदेशातही कडाक्याची थंडी वाढली आहे. त्यामुळे भुंतर आणि सुंदरनगरमध्ये शून्य अंश, मनालीमध्ये उणे शून्य अंश, नाहन आठ अंश, उना पाच अंश, सोलन शून्य अंश, सिमला तीन अंश, धर्मशाला दोन आणि कल्पामध्ये पारा उणे शून्य अंशावर घसरला.
 

बातम्या आणखी आहेत...