आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • North Korea Calls Trump Old Man, US Calls UN Meeting To Discuss North Korea Provocation

उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले 'मुर्ख म्हातारा', अमेरिकेने भडकाऊ भाषणांवर चर्चा करण्यासाठी यूएनची बैठक बोलवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोरियाने शनिवारी अमेरिकेसोबत चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला

वॉशिंग्टन- अमेरिकेने उत्तर कोरियाकडून होत असलेल्या भडकाऊ भाषणांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राची बैठक बोलवली. अमेरीकेने डिसेंबरमध्ये सुरक्ष परिषदेचे अध्यक्षपद आपल्या हाती घेतले आहे. त्यामुळेच या महिन्यात सुरक्षासंबंधी महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावनी ट्रम्प सरकारला या महिन्यात करावी लागणार आहे. एक दिवसापूर्वीच उत्तर कोरियाने ट्रम्प यांच्यावर मिश्किल टीका करत मुर्ख म्हातारा असे म्हटले. सरकारी न्यूज एजंसी केसीएनएकडून सांगिले की, अमेरिकेने 31 डिसेंबरपर्यंत उत्तर कोरियाला निर्बंधावर सूट द्यावी, नाहीतर परमाणु करारावर कोणतीच चर्चा होणार नाही.

उत्तर कोरियावर चर्चा करण्यासाठी अचानक बैठक का बोलवली?
 
उत्तर कोरियाने अमेरिकेसोबत परमाणू करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर लादलेले निर्बंध हटवण्याची मागणी केली होती. ट्रम्प यांनी मागच्या वर्षी घोषणा केली होती की, उत्तर कोरियाला 2019 च्या शेवटापर्यंत आर्थिक निर्बंधावर सूट दिली जाईळ. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग-उन यांनी याबाबत अनेकवेळा चर्चाही केल्या आहेत. पण, अद्याप उत्तर कोरियाला स्पष्टपणे सूट मिळाली नाहीये.यावर उत्तर कोरिया नाराज आहे. उत्तर कोरियाने परराष्ट्रमंत्री किम सोंगने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, अमेरिकेसोबत दीर्घ चर्चेची गरज नाही आणि करार करण्याची वेळ संपली. किम सरकारे अमेरीकेला इशारा दिला आहे की, महिना संपेपर्यंत आर्थिक निर्वंधावर सूट द्यावी, अन्यथा परमाणू करारावर चर्चा होणार नाही.