Home | International | Other Country | North korea has unique way of election process for supreme leader

उत्तर कोरियात अशी होते राष्ट्राध्यक्ष निवडणूक, निकालांपूर्वीच ठरतो विजेता; उमेदवारांच्या यादीत नाव एकच!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 04:04 PM IST

देशभक्तीच्या नावे नेत्याला समर्थन मिळवून दिले जाते

  • North korea has unique way of election process for supreme leader

    प्योंगयंग - जगातील सर्वात एक्कलकोंडा देश उत्तर कोरियात पुन्हा राष्ट्राध्यक्ष निवडणूक झाली. या प्रक्रियेला जगभरात लोकशाही निडणूक असल्याचे दाखवले जात असले तरीही परिस्थिती सर्वांसमोर उघड आहे. देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन पुन्हा सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे नेते आणि ‘डेमोक्रेटिक पीपुल्स रिपब्लिक ऑफ कोरिया' अर्थात उत्तर कोरियाचे नेते होणार हे पूर्वनियोजित होते. तरीही फक्त दाखवण्यासाठी प्रत्येकी पाच वर्षांसाठी ‘सुप्रीम पीपल्स असेंबली'च्या निवडणुका आयोजित केल्या जातात.


    उत्तर कोरियात यंदा देखील 'एकनिष्ठ एकता' अशा घोषणा दिल्या जात आहेत. मतदानाच्या वेळी मतपत्रावर केवळ एकच नाव असतो. तरीही लोक त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी पोलिंग बूथवर जातात. यामध्ये मतदारांना ते एकमेव नाव खोडण्याची संधी दिली जाते. परंतु, आतापर्यंत तसे कुणीही केलेले नाही. रविवारी संध्याकाळी सहा वाजता सरकारी वृत्तवाहिनीवर बातम्या जारी करण्यात आल्या. त्यानुसार, सर्वांनीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. जे परदेशात आहेत त्यांनी मतदान केले नाही.


    दरवेळेस होतो शंभर टक्के मतदान
    उत्तर कोरियात यापूर्वी 2014 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक झाली होती. त्यावेळी मतदानाचा आकडा 99.97 टक्के होता. नेहमीच जवळपास शंभर टक्के मतदानाचा येथे रेकॉर्ड आहे. ज्या शून्य पॉइंट काही लोकांनी मतदान केले नाही ते देशाबाहेर होते असे सांगण्यात आले. उत्तर कोरियात होणाऱ्या निवडणुकी दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळणार नाहीत. त्यातही सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्तीच्या नावाने नेत्याची भक्ती भरलेली असते. आपल्या नेत्याला एकमताने जिंकून द्यावे अशी भावना त्यांच्या मनात जागृक केली जाते. देशात असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो या नेत्याच्या नावाला विरोध करेल.

Trending