आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Korea Leader Kim Jong Un Visits China For Summit With Xi Jinping

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन सपत्निक चीनमध्ये, वाढदिवशी घेतली सर्वात जवळच्या मित्राची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन आणि त्यांच्या पत्नी री सोल जू मंगळवारपासून चीन दौऱ्यावर आहेत. सत्ता सांभाळली तेव्हापासून त्यांनी चीन दौरा केल्याची ही चौथी वेळ आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी सुद्धा या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे, किम जोंग उन यांचा 8 जानेवारी रोजी 35 वा वाढदिवस आहे. अशात वाढदिवशी ते सहकुटुंब आपल्या सर्वात जवळच्या मित्राची भेट घेतली. यासोबतच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या प्रस्तावित भेटीची तयारी करत आहेत असे सांगितले जात आहे.

 

ट्रम्प यांच्या दुसऱ्या भेटीची तयारी!
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि सर्वात मोठ्या शत्रू राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची गतवर्षी ऐतिहासिक भेट झाली. त्या भेटीच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी किम चीन दौऱ्यावर गेले होते. त्याच दौऱ्यात किम आणि ट्रम्प यांच्या सिंगापूर दौऱ्याची रूपरेषा ठरली होती. त्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आश्वासने दिली होती. किम जोंग उन यांनी अण्वस्त्र त्याग आणि चाचणी स्थळ नष्ट करण्याचे आपले आश्वासन पूर्ण केले. परंतु, ट्रम्प यांनी या देशावरील निर्बंध हटवण्याचा संकल्प अजुनही पूर्ण केला नाही. उलट उत्तर कोरियाला आणखी दाबण्याचे प्रयत्न सुरू केले. अशात याच वर्षाच्या सुरुवातीला किम यांनी पुन्हा ट्रम्प यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. त्या प्रस्तावास ट्रम्प यांनीही ट्वीट करून सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, भेट कधी आणि कुठे होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशात चीन दौऱ्यात प्रामुख्याने किम आणि शी याच मुद्द्यावर चर्चा करणार हे निश्चित आहे.

 

“Kim Jong Un says North Korea will not make or test nuclear weapons, or give them to others - & he is ready to meet President Trump anytime.” PBS News Hour. I also look forward to meeting with Chairman Kim who realizes so well that North Korea possesses great economic potential!

— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 1, 2019