आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणलोट क्षेत्रात 307 मिमी पाऊस, हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल ३०७ मिमी पाऊस झाला. यापाठोपाठ बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ मिमी पावसाची भर पडल्याने धरणात पाण्याची आवक वाढली. यामुळे बुधवारी पहाटे हतनूरचे १२ दरवाजे पूर्ण उघडून प्रतिसेकंद ७७८ क्युसेक म्हणजेच २७ हजार ४७१ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे तापी नदीला पूर आला असून तापी व पूर्णाकाठच्या रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तापी व पूर्णा नदीच्या पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या २४ तासांमध्ये ३०७ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत पुन्हा ५१ मिमी पाऊस झाला. यामुळे धरणाचे १२ दरवाजे उघडून ७७८ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. सध्या हतनूरची जलपातळी २०९.५३० मीटर, १८०.६० एकूण आणि ४७.६० दलघमी जलसाठा शिल्लक आहे. 


बुधवारपर्यंत पाण्यात तीन पटींनी झाली वाढ
धरणातून रविवारपासून विसर्ग सुरू असून बुधवारी पहाटे तो तीन पटींनी वाढवण्यात आला. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तापीचे पात्र प्रथमच खळाळले आहे. ही स्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने हतनूर धरण, तापी व पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  


सांगलीत विश्रांती
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाचा रिपरिप बुधवारी थांबली. सांगली, मिरज शहरात पावसाचा जोर ओसरला असून दिवसभर पावसाच्या तुरळक सरी पडल्या. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता आहे.


ताणी, पूर्णा नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन
हतनूर धरणातून विसर्ग होत असून या काळात तापी व पूर्णा नदीच्या पात्रात कुणीही उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, बुधवारच्या पावसामुळे धरणातील आवक वाढेल, असा अंदाजही उपविभागीय अभियंता एन.पी.महाजन यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...