आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात पारा घसरला, पावसाचाही इशारा; मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात कमालीची घट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. या वाऱ्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात कमालीची घट दिसून आली. विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा अधिक राहिले. नाशिक जिल्ह्यात निफाड येथे पारा ६ अंशांवर घसरला होता. नाशिक, नगर, औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यात पारा १० अंशांच्या खाली होता. पुणे वेधशाळेनुसार, मराठवाड्यासह राज्यात ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...