आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच बालमृत्यू कुपोषणामुळे झालेले नाहीत, मृत्यूंमागे मागे इतरही कारणे : पंकजा मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बालमृत्यू हे वाईटच असून ते रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण प्रत्येक बालमृत्यू हे कुपोषणामुळे झाले नसून त्यासाठी इतरही कारणे असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले, तर राज्यात बालमृत्यू आणि कुपोषण घटल्याचा दावाही त्यांनी केला. 


विधानसभेत महिला बचत गटांना पोषण आहारासाठी दिल्या जाणाऱ्या धान्यामध्ये कपात केल्याच्या प्रश्न आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केला. शाळांतील पोषण आहारासाठी महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या धान्यात ६० ते ८०  टक्के कपात केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. २०१८ मध्ये तांदळात ६१.२०%, तर गहू पुरवठ्यात ७८.३३% कपात करण्यात आली. पालघर जिल्ह्यात असे प्रकार घडल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, पोषण आहारासाठी केंद्र शासनाकडून कमी प्रमाणात धान्य मिळाले असले तरी राज्याने यात कोणतीही कपात केलेली नाही. बालमृत्यू हे वाईटच आहेत, पण त्यांची कारणे केवळ कुपोषण नसून कमी वजनाचे बाळ, प्रीमॅच्युअर बेबी, अॅनिमिया, न्युमोनिया अशा विविध कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. थेट धान्य दिल्याने बाळाच्या आरोग्यावर परिणाम पडत नाही, तर आईचे आरोग्य चांगले राहते. आई कुपोषित झाली तर बाळ कुपोषित होते. राज्यात बालमृत्यू आणि कुपोषण दाेन्हीही घटल्याचा दावा त्यांनी केला. 
 

पालघरात वर्षभरात ३४८ बालकांचा मृत्यू
एकट्या पालघर जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४६९ बालमृत्यू झाले होते. २०१८-१९ मध्ये हे प्रमाण ३४८ वर आले. कुपोषणही घटले. मध्यम स्वरूपाच्या कुपोषणाची प्रकरणे २०१७ मध्ये ३०६२, तर २०१९ मध्ये १९२० झाले.