आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदा नव्हे, उत्साही गोपिकाच, फोडली दहीहंडी जोरात .... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : हरे कृष्ण, नंद के लाल, जय जय बोलो जय गोपाल म्हणत गोपिकांनी मोठ्या जोशात आपल्या आवडत्या श्रीकृष्णाची दहीहंडी फोडून गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी उपस्थितांमधून गोविंदाच्या नावे तर गोपिकांनी दहीहंडी फोडली जोरात अशा प्रतिक्रिया येत होत्या.    जुळे सोलापुरातील डी-मार्टजवळ असलेल्या वैष्णवी प्लाझा येथील परिसरातील महिलांनी गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा अपूर्व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला. याचे आयोजन संभाजी ब्रिगेड आणि चौधरी फाउंंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.    सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी संभाजी ब्रिगेड व चौधरी फाउंंडेशन यांच्या वतीने जुळे सोलापुरात महिला जागृती निर्माण करण्यासाठी महिलांचा दहिहंडी उत्सव घेण्यात आला. या ठिकाणी महिला गोविंदांनी वाजत-गाजत मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली. यामध्ये दामिनी पथक व प्रारंभ प्रतिष्ठान (ढोल पथक) यांनी विशेष सहभाग घेतला होता.    ढोल वादनाच्या दमदार वातावरणात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी अनिता गावडे यांनी दहीहंडी फोडली. कार्यक्रमात गौरव आणि बक्षिसांचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका संगीता जाधव, फिरदोस पटेल, साई महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सायली जोशी, हेमंत चौधरी, मनीषा उडानशिव, मुमताज गौर, शौकत पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.    याप्रसंगी शहराध्यक्ष शाम कदम, चौधरी फाउंडेशनचे संस्थापक चेतन चौधरी, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, करण लांबतुरे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि चौधरी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.    दिसून आली सन्मान आदराची भावना महिला गोविंदा दहीहंडी फोडणार आहे, असे वातावरण असल्यामुळे सर्वच पुरुष मंडळींनी बाजूनी फेर धरला होता. मोठ्या उत्साहाने आणि आदराने सन्मानाने या दहीहंडीच्या उत्सवात पुरुष समर्थकांच्या रूपाने सहभागी झाले होते. दूर उभे असले तरी या सर्वांनी महिला गोविंदांबद्दल सद्भावना ठेवून कार्यक्रम कसा उत्तम होईल याकडे विशेष लक्ष दिले. 

बातम्या आणखी आहेत...