आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी ट्विटर व सोशल मीडियावर वर्ल्ड वॉर ३ हा ट्रेंड सुरू होता. अमेरिका इराणवर हल्ला करेल असे लोकांना वाटत होते. परंतु ट्रम्प यांनी 'ऑल इज वेल' असे ट्विट करून आणि पत्रकार परिषदेत शांततेचे आवाहन करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वीही ट्रम्प यांनी अनेक वेळा धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत. अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. ३ नोव्हेंबर २०२० ला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. ऐन निवडणुकीपूर्वी ट्रम्प महाभियोग प्रक्रियेचा सामना करत आहेत.
द वॉशिंग्टन पोस्टनुसार आपल्या कार्यकाळात ट्रम्प आतापर्यंत १५,४१३ पेक्षा जास्त वेळा खोटे बोलले आहेत
1. सिरियात युद्ध थांबवण्याचा निर्णय: डिसेंबर २०१८ मध्ये तुर्की राष्ट्राध्यक्षंनी फोन करून सीमापार हल्ला करण्याचे नियोजन होते, पण ट्रम्प यांनी उत्तर सिरियातून अमेरिकन सैनिकांना काढून घेण्याचा आदेश दिला. सिरियात असलेले आपले २००० सैनिक परत बोलावण्याचा आदेश दिला. व्हाइट हाऊसचे अधिकाराही ट्रम्प यांच्या या निर्णयाने चकित झाले. तत्कालीन संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनीही राजीनामा दिला होता.
2. उत्तर कोरियात किम जोंग यांना भेटणारे पहिले राष्ट्राध्यक्ष : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग एकमेकांवर चिखलफेक करत धमक्या देत आले आहेत. असे असूनही उत्तर कोरियाला भेट देणारे ट्रम्प पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प जून २०१९ मध्ये किम जोंग यांना कोरियन मिलिटराइज्ड झोनमध्ये भेटले होते.
3. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिला दौरा सौदी अरबचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सर्वात आदी मुस्लिम देशांतून येणाऱ्यांवर प्रवासबंदी लावण्याबाबत आदेश जारी केले होते. परंतु, त्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांनी सौदी अरबचा पहिला विदेश दौरा केला.
4. भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणे: जुलै २०१९ मध्ये ट्रम्प यांची इम्रान खान यांच्याशी भेट झाली होती. ट्रम्प यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांनी मला काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास सांगितले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आक्षेपानंतर 'हा त्यांचा द्विपक्षीय मुद्दा आहे,' असे अमेरिकेने म्हटले होते.
5. वार्ताहराला बाहेर काढले: डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये सीएनएन चॅनलचे वार्ताहर जिम एकोस्टा यांनी टोकदार प्रश्न विचारल्यावर त्यांची व्हाइट हाऊसची अधिमान्यता रद्द केली होती.
6. जेव्हा स्वत:साठी मागितला शांततेचा नोबेल पुरस्कार : ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. पुरस्कार नि:पक्षपणे दिला गेला असता तर मला फार पूर्वीच मिळाला असता, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
7. जिंकलेल्या निवडणुकीवरच प्रश्न उपस्थित केले: ट्रम्प असे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांनी राष्ट्राध्यपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडणुकीच्या नि:पक्षतेवरच प्रश्न उपस्थित केले होते.
8. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन : ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी अमेरिकी संसदेकडे सरकारी तिजोरीतून पाच अब्ज रुपये मागतिले होते. डेमोक्रॅटिक खासदारांनी याला विरोध केल्याने ट्रम्प सरकारला शटडाऊनचा सामना करावा लागला होता.
9. हुकूमशहा मुसोलिनींचा संदेश केला रीट्विट: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी फेब्रुवारी २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकनचे उमेदवार असताना त्यांनी इटलीचे हुकूमशहा यांचा एक संदेश रीट्विट केला होता.
10. सैन्यात ट्रान्सजेंडर नको: अमेरिकेच्या लष्करात ट्रान्सजेंडर सैनिकांचा समावेश करू नये, अशी माहिती ट्रम्प यांनी जुलै २०१७ मध्ये ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. नंतर सुप्रीम कोर्टानेही ट्रम्प यांच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. कनिष्ठ न्यायालयांमध्ये हे प्रकरण सुरू आहे. ओबामांच्या कार्यकाळात हा निर्णय लागू करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.