आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Not Rahul, Priyanka Was The First Choice Of Indira Gandhi As Her Successor Claims Book

राहुल नव्हे, प्रियांका होत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत! त्यांना मानले होते उत्तराधिकारी; येथे झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. वेळोवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यासाठी राहुल गांधी नव्हे, तर प्रियांका गांधींना मैदानात उतरण्याचे आवाहन केले. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचीही तशीच इच्छा होती. त्यांनी राहुल गांधी नव्हे, तर प्रियांकामध्ये आपला वारसदार पाहिला होता असा दावा करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले एम.एल. फोतेदार यांनी हा दावा केला आहे. फोतेदार यांनी त्यांच्या पुस्तकात यासंदर्भातील खुलासा केला आहे. त्यासोबतच इंदिरा गांधींना त्यांचा शेवट जवळ आला आहे, असे हत्येआधीच वाटायला लागले होते. असेही पुस्तकात म्हटले आहे.


आणखी काय आहे पुस्तकात
इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, फोतेदार यांनी पुस्तकात म्हटले आहे, की ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरांनी काश्मीरचा दौरा केला होता. तिथे त्या एका हिंदू आणि एका मुस्लिम धार्मिकस्थळी गेल्या होत्या. हिंदू मंदिरात इंदिरा गांधींनी असे काही पाहिले की त्यांना वाटायला लागले की आपले जीवन आता शेवटाच्या जवळ आले आहे. त्यानंतर बऱ्याच विचारांती त्यांनी असे म्हटले होते, की प्रियंकाला राजकारणात मोठे यश मिळू शकते आणि बराच काळ ती सत्ते राहू शकते.
 

इंदिरा गांधींना स्वतःचा अंत जवळ आल्याचे कसे कळाले
>> फोतेदार यांनी पुस्तकात म्हटले आहे, की इंदिरा गांधींनी मंदिरात एक सुकलेले झाड पाहिले होते. त्याचा अर्थ त्यांनी, आपले जीवन आता अंताच्या जवळ आले असल्याचा काढला होता.
>> फोतेदार म्हणाले, इंदिरांना कळाले होते की माझ्या नजरेतूनही ती गोष्ट सुटलेली नव्हती. रेस्ट हाऊसकडे जातांना त्यांनी मन मोकळे करत या गोष्टीचा उल्लेख केला होता.
>> राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फोतेदार यांनी सोनियांना एक पत्र लिहून इंदिरा गांधींच्या विचारांबद्दल माहिती दिली होती.


फोतेदार यांच्या पुस्तकाचे नाव 'चिनार लीव्स' (चिनाराची पाने) आहे. त्यात ते माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांच्या दाव्याचे समर्थन करताना दिसतात. नटवरसिंहांनी दावा केला होता की, 'अंतर आत्म्याचा आवाज' ऐकून नाही तर कुटुंबाच्या दबावामुळे सोनिया गांधींनी 2004 मध्ये पंतप्रधान पदाला नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...