Home | Gossip | not ranveer singh, randeep hooda was the first choice for the film '83'

फिल्म '83' साठी कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह नाही रणदीप हुड्डा होता पहिली पसंती 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 23, 2019, 05:18 PM IST

फिल्मचे डायरेक्शन कबीर खान करत आहेत...

  • not ranveer singh, randeep hooda was the first choice for the film '83'

    बॉलिवूड डेस्क : कबीर खानची फिल्म '83' चे शूटिंग पुढच्या महिन्यापासून लंडनमध्ये सुरु होणार आहे. ही फिल्म 1983 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या झालेल्या विजयावर आधारित आहे. यामध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह करणार आहे. सर्वांना वाटते आहे की, रणवीरला त्याच्या उंच शरीरयष्टीमुळे कपिल देव यांची भूमिका मिळाली आहे, पण सत्य हे आहे की, रणवीर कधीच कपिल यांच्या रोलसाठी पहिली पसंती नव्हता.

    रणवीर नव्हता कपिल यांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती...
    एका रिपोर्टनुसार, या फिल्मचे डायरेक्शन आधी लाहौर (2010) सारख्या फिल्म बनवणारे संजय पूरण सिंह कर्नारवं होते आणि त्यांची इच्छा होती की, रणदीप हुड्डाने कपिल देव यांची भूमिका साकारावी. फिल्मसाठी संजयने रणदीपचा लुक टेस्ट आणि ऑडिशन दोन्ही घेतले होते आणि रणदीप या रोलसाठी जवळपास फायनल होता, पण अचानक संजयच्या हातून फिल्म जाऊन कबीर खानच्या खात्यात जमा झाली आणि कबीरने कपिल यांच्या रोलसाठी रणवीरला फायनल केले.

    ही फिल्म पुढच्यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज होईल. सध्या सर्वच कलाकार क्रिकेटरच्या भूमिकेमध्ये फिट बसण्यासाठी मेहनत करत आहेत. फिल्मची पूर्ण टीम खऱ्या वर्ल्ड कप विजेता टीमचा भाग असलेल्या खेळाडूंसोबत ट्रेनिंग सेशनमध्ये व्यस्त आहे.

Trending