आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांपासून टाळाटाळ करत होता तहसीलदार, महिलांनी काठ्या दाखवून आणले गावात अन् करून घेतले काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलवर (राजस्थान) - वाटेतील अतिक्रमणे हटवण्यामध्ये 6 महिन्यांपासून टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदारांना गावकरी महिलांनी लाठ्या दाखवून बळजबरी गावात आणले. वाटेतूनच ते इकडे-तिकडे निघून जाऊ नये म्हणून त्यांच्या जीपच्या पुढे आणि मागे गावकऱ्यांच्या दोन गाड्या होत्या. नंतर गावात नेऊन अतिक्रमण काढायला लावले.

 

वास्तविक, भीटेड़ा गावातील बहरोड़-मांढ़ण रस्त्यावर शीशवाले बाबा हे प्राचीन मंदिर आहे. यासमोर एक रस्ता आहे. यावर लोकांनी कच्चे आणि पक्के बांधकाम केलेले आहे. 6 महिन्यांपूर्वी कोर्टाने येथून अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती. अधिकाऱ्यांनी फक्त दंड लावला. गावकरी सातत्याने अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची विनंती करत होते. परंतु ते फक्त तारीख पे तारीख देत राहिले. आपल्या विनंतीचा काहीच परिणाम होत नसलेला पाहून गावातील संतप्त महिला-पुरुषांनी गुरुवारी सकाळी लाठ्याकाठ्या घेऊन गाड्या काढल्या आणि तहसीलदारांच्या कार्यालयावर धडक दिली.

 

तहसीलदारांनी टाळाटाळ केल्यावर चिडल्या महिला: 
तहसीलदार बाबूलाल मीणा यांनी तेव्हाही टाळाटाळ केली, म्हणून महिला चिडल्या. त्या लाठ्या-काठ्या दाखवत तहसीलदारांना बाहेर घेऊन गेल्या. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहिल्यावर तहसीलदारांनी गाडी काढली आणि तलाठ्याला सोबत घेऊन त्यात बसले. ड्रायव्हरच्या जागेवर तलाठी बसला, तेव्हा महिलांना संशय आला की, बहुधा तहसीलदार वाटेतून त्यांना गुंगारा देऊन निघून जाईल. हे पाहून महिलाही लाठ्याकाठ्या घेऊन त्यांच्या सरकारी गाडीत बसल्या आणि सोबत येण्यावर अडून बसल्या. इतर महिला दोन वाहनांमधून तहसीलदारांच्या जीपच्या पुढे व मागे होत्या. यानंतर गावातील रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...