आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नोटा'ला देशात मिळाली आजवर 8 मतदारसंघांत 8 टक्क्यांपेक्षा अधिक मते, पैकी 4 महाराष्ट्रात; लातूर ग्रामीणमध्ये 'नोटा' विक्रमी दुसऱ्या स्थानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : नोटा' (नन ऑफ अबव्ह) या नकाराधिकाराला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याचा ट्रेंड यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिला. यंदा नोटा' च्या पारड्यात अवघी १.४ टक्केच मते पडली आहेत. असे असले तरी नोटाच्या वापरात यंदा महाराष्ट्राने विक्रमही घडवला आहे. 'नोटा'ला १३.७८ टक्के मते देणारा लातूर ग्रामीण हा देशातील पहिलाच मतदारसंघ ठरला आहे. पलूस आणि जोगेश्वरी पूर्वमध्ये नोटाच्या वाट्याला ८ टक्क्यांहून अधिक मते पडली आहेत. लातूर आणि पलूसमध्ये नोटा दुसऱ्या क्रमांकावर राहिले हे विशेष. निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पसंतीचा किंवा योग्य वाटणारा उमेदवार नसेल तर वरीलपैकी एकही नाही' (None Of The Above) म्हणजेच नोटा' पर्याय उपलब्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१३ च्या आदेशान्वये नोटा'चा पर्याय उपलब्ध झाला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल समजले जात असले तरी नोटा' चा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. यंदाही कमीच वापर : २०१३ मध्ये नोटा लागू झाल्यापासून देशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण ४५ निवडणुकांत नोटा' ला मिळणाऱ्या मतांची संख्या कमी होत चालली आहे. यंदा महाराष्ट्रात नोटाला १.४ % तर हरियाणात ०.५ % मते पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार २०१३ नंतर झालेल्या ४५ निवडणुकांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे... १९ निवडणुकांत नोटाला १% च्या आत मते मिळाली. २४ निवडणुकांत नोटाला १% ते २% मते मिळाली. ०१ निवडणुकांत नोटाला २% ते ३% मते मिळाली. ०१ निवडणुकीत नोटाला ३% हून अधिक मते. ९६% निवडणुकांत नोटा' ला २ टक्क्यापेक्षा कमी मते. फक्त एकदाच २% पार वर्ष नोटा(%) २०१३ १.९३ २०१४ ०.९१ २०१४ (लोकसभा) १.०८ २०१५ २.०७ २०१६ १.२५ २०१७ १.०६ २०१८ १.२५ २०१९ १.१८ २०१९ (लोकसभा) १.०६ २०१९ विधानसभा १.४ आठ मतदारसंघात नोटा ८ टक्क्यांच्याही पार आतापर्यंत देशातील फक्त ८ मतदारसंघातच नोटाने ८ टक्क्यांहून अधिक मते मिळवली आहेत. यात ४ मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्राने यंदाच्या विधानसभेत नोटाच्या बाबतीत विक्रम घडवला आहे. लातूर ग्रामीणमध्ये २७,५०० (१३.७८ %) मते घेत नोेटा दुसऱ्या स्थानावर राहिले. नोटाला देशात मिळालेले हे सर्वाधिक मताधिक्य आहे. लातूर ग्रामीण २०१९ १३.७८ % गडचिरोली २०१४ १०.८० % विजापूर २०१३ १०.१५ % पलूस २०१९ ९.९९ % चित्रकूट २०१३ ९.०९ % दांतेवाडा २०१३ ८.९३ % दांतेवाडा २०१८ ८.७४ % जोगेश्वरी पूर्व २०१९ ८.०९%  

बातम्या आणखी आहेत...