आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - नोटबंदीच्या वेळी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांनी दोन वर्षांनंतर या निर्णयावर टीका केली आहे. नोटबंदी क्रूर, विचित्र निर्णय होता. यामुळे देशाला आर्थिक झटका बसल्याचे सुब्रमण्यन यांनी सांगितले. ते म्हणाले की, नोटबंदी माझ्या समजण्यापलीकडची असून आधुनिक भारतीय इतिहासात सर्वात विचित्र आर्थिक प्रयोगांपैकी एक आहे. नोटबंदीआधी सहा तिमाहीत सरासरी विकास दर ८.१ टक्के होता.
नोटबंदीनंतर तिमाहीत हा घसरून ६.८% राहिला. असे असले तरी हा निर्णय लागू करताना सरकारने त्यांचा सल्ला घेतला होता की नाही याबाबत त्यांनी अद्याप मौन पाळले आहे. या वर्षी जूनमध्ये सुब्रमण्यम यांनी ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंत होता.
सुब्रमण्यम यांचे पुस्तक “ऑफ काैन्सिल : द चॅलेंज ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील एक प्रकरण नोटबंदीचे दोन पैलू- राजकीय व आर्थिक यामध्ये ही बाब पुढे आली आहे. त्यांनी लिहिले की, एकाच झटक्यात ८६ टक्के नोटबंदी करण्यात आली. यामुळे जीडीपी विकासावर परिणाम झाला. असे असले तरी वाढीतील घसरण आधीपासूनच येऊ लागली होती. मात्र, नोटबंदीने त्याला गती दिली.
नोटबंदीमुळे विकासदर मंदावला याच्याशी कोणी असहमत असेल, असे वाटत नाही. याचा परिणाम २ टक्के किंवा त्यापेक्षा कमी झाला का? या मुद्द्यावर चर्चा अवश्य होऊ शकते. या अवधीत चढे व्याजदर, जीएसटी व तेलाच्या किमतींनीही विकास दर प्रभावित केला. नोटबंदीसारख्या पावलामुळे असंघटित क्षेत्र प्रभावित झाले. त्यामुळे केवळ संघटित क्षेत्राच्या आकड्यांच्या आधारावर जीडीपी वृद्धी सांगणे अप्रामाणिक ठरेल. नोटबंदीच्या राजकीय पैलूवर लिहिले की, सध्या कोणत्याही देशाने सामान्य स्थितीत नोटबंदीचा निर्णय घेतलेला नाही.
हळूहळू चलन बदलले गेले. युद्ध, जास्त महागाई, चलन संकट किंवा राजकीय संघर्षा(व्हेनेझुएला २०१६) सारख्या स्थितीत नोटबंदीसारखे पाऊल उचलले होते. सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास भारतात घेतलेला निर्णय अनोखा होता. या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजप विजयी झाला. नोटबंदीच्या निर्णयावर लोकांचे शिक्कामोर्तब असल्याचे सांगण्यात आले होते. मोठ्या उद्देश प्राप्तीसाठी गरिबांची अपरिमित हानी झाल्याचे त्यांनी सांगितले.
१२ ऑगस्ट २०१७ मध्ये म्हटले
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेत रोकड २०% कमी झाली, ५.४ लाख नवे करदाते जोडले आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षणात सुब्रमण्यम यांनी सांगितले होते की, नोटबंदीनंतर रोकड २०% कमी झाली. नोटबंदीनंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत साधारण ५.४ लाख नवे करदाते जोडले आहेत.
कौटुंबिक कारणातून राजीनामा
सुब्रमण्यम यांनी कौटुंबिक कारणामुळे राजीनामा दिला होता. तेव्हा त्यंानी सांगितले हेाते की, माझ्या अवधीची डेडलाइन सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तेव्हा माझा नातू जन्माला येईल. पदत्याग केल्यानंतर मी माझ्या अायुष्यात परतेन. संशोधन करेन, लिहीन व वाचन करेन,अससुब्रमण्यम म्हणाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.