आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराधा पौडवाल यांची मुलगी होण्याचा दावा करणाऱ्या महिलेला नोटीस बजावली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडची दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला अाहे. सुप्रीम काेर्टाने तिरुवनंतपुरममध्ये काैटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर बंदी घातली अाहे. न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या करमाला मोडेक्स यांना नाेटीस पाठवली आहे. अनुराधाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत तिरुवनंतपुरम फॅमिली कोर्टात दाखल प्रकरण मुंबईच्या फॅमिली कोर्टात पाठवण्याची मागणी केली आहे. करमालाने अनुराधावर ५० कोटी रुपये आणि त्यांच्या संपत्तीतील एक चतुर्थांश भाग देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात तिरुवनंतपुरमच्या न्यायालयाने अनुराधा आणि त्यांच्या दोन मुलांना समन जारी करत २७ जानेवारी रोजी हजर होण्याचे सांगितले होते. त्यामुळे अनुराधा पौडवालने सुप्रीम कोर्टात ट्रान्सफरसाठी अर्ज केला आहे.

बातम्या आणखी आहेत...