Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Notice to 62 teachers for bogus certificate

बोगस प्रमाणपत्रप्रकरणी ६२ शिक्षकांना नोटिसा देणार; फाइल स्वाक्षरीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 12:05 PM IST

बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६२ शिक्षकांना शिक्षण विभाग येत्

  • Notice to 62 teachers for bogus certificate

    नगर- बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६२ शिक्षकांना शिक्षण विभाग येत्या तीन दिवसांत नोटिसा बजावणार आहे. या नोटिसांची फाइल शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी गेली आहे.


    जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या कार्यकाळात बदलीसाठी ७२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर करत जिल्हा परिषदेची फसवणूक केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेने फसवणूक करणाऱ्या ७२ शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली. आताही बदलीसाठी शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर केली आहेत. ४२ शिक्षकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र, १७ शिक्षकांनी पत्नी-पत्नी एकत्र असल्याचे कारण दिले असताना काही ठिकाणी शिक्षक खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत.


    आजाराचे कारण सांगून प्रमाणपत्र देणारे तीन अशा ६२ शिक्षकांना शिक्षण विभाग नोटिसा बजावणार आहे. चुकीचे प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याचे नोटिशीत म्हटले आहे. नोटिसांची फाईल सोमवारी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या स्वाक्षरीसाठी गेली आहे. मंगळवारी नोटिसांवर शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होणार असून, बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होणार आहे. त्यानंतर गुरुवारी संबंधित शिक्षकांना या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे कळते.

Trending