आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Notices Issued For Recovery Of Damages Against Some Protester Of Citizenship Law, Collection Of 25 Lac In Total

नागरिकत्व कायदाविरोधी आंदोलनातील नुकसानीच्या वसुलीसाठी बजावल्या नोटिसा, एकूण 25 लाखांची करणार वसुली

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लखनऊ/ नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बुधवारी ९ राज्यांमध्ये तीव्र आंदोलन सुरू होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात या आंदोलनादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली असून २८ आरोपींची ओळख पटवून २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. यात लाठीमारात तुटलेल्या काठ्या, अश्रुधुर आणि पॅलेट गन्सच्या गोळ्यांचा खर्चही समाविष्ट आहे.

दुसरीकडे, वाराणसीत २० डिसेंबरच्या हिंसाचारात जमावाला भडकावणाऱ्यांचे पोस्टर लावण्यात आले असून लखनऊमध्ये १०० वर लोकांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह औरंगाबाद व इतर काही शहरांत नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ माेर्चे काढण्यात आले.

कर्नाटक सरकारचा यू-टर्न

मंगळुरूत मारल्या गेलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा करणाऱ्या येदियुरप्पा सरकारने बुधवारी यावर भूमिका बदलून चौकशीअंतीच निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.

विद्यार्थिनीने सीएएची प्रत फाडली

जाधवपूर विद्यापीठात दीक्षांत समारंभारत एमएची पदवी स्वीकारल्यानंतर देबोस्मिता चौधरी या विद्यार्थिनीने नागरिकत्व कायद्याची प्रत फाडून विरोध व्यक्त केला.

अमेरिकेतही समर्थनार्थ मोर्चे

वॉशिंग्टन : नागरिकत्व कायद्यासह एनआरसी समर्थनार्थ अमेरिकेतील भारतीयांच्या संघटनांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले.

आयुक्तांची मुस्लिमांशी चर्चा

नागरिकत्व कायद्याबद्दलचा संशय दूर करण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी बुधवारी काही मुस्लिम गटांशी चर्चा केली.

पहिला खुला तुरुंग सुरू


कर्नाटकात बंगळुरूजवळ सोंडेकोप्पा गावात पहिला खुला तुरुंग सुरू करण्यात आला असून येथे अवैधरीत्या देशात राहणाऱ्या घुसखोरांना ठेवले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...