इंग्लंड / एक वर्षापूर्वी जीभेचा कँसर झाल्याचे कळाले, डॉक्टरांनी हाताची त्वचा कापून बनवली नवीन जीभ

कँसरमुळे जेवणात आणि बोलण्यात त्रास व्हायचा

Sep 22,2019 04:04:00 PM IST

नॉटिंघम- नॉटिंघमशायरच्या रशक्लिफची रहिवासी रेबेका पेटरसनचे जिभेच्या कँसरचे ऑपरेशन झाले. तिला एप्रिल 2018 मध्ये जीभेचा कँसर असल्याची माहिती कळाली होती. रेबेकाला 8 वर्षांपासून कँसर होता, पण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा हा कँसर ठीक नाही झाला, त्यानंतर तिने बायोप्सी करुन घेतली. एक वर्ष तिला जेवणात आणि बोलण्यात त्रास होत व्हायचा, डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी कँसर असल्याची माहिती दिली. हे जिभेचे ऑपरेशन करुन ती ठीक झाली.


कँसरच्या ऑपरेशनच्या 11 तासानंतर जेव्हा रेबेकाला शुद्ध आली, तेव्हा ती नॉटिंघमच्या मेडिकल सेंटरमध्ये होती. डॉक्टरांनी जीभेचा कँसरग्रस्त भाग, लाळ ग्रंथी आणि दोन दात काढून टाकले. त्याच्या ऐवजी तिच्या डाव्या हातातील त्वचेचा भाग काढून त्यांनी जिभेच्या ठिकाणी लावला. आता तिला बोलता येत आहे.

X