आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पतीची हत्या कशी करावी?' यावर कादंबरी लिहून केला पतीचा खून; फेसबुक पोस्टच्या आधारे पोलिसांनी केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑरिगन- 'पतीची हत्या कशी करावी?' या विषयावर निबंध लिहिणाऱ्या शृंगारिक कादंबरी लेखिका नॅन्सी क्रॉम्पटन ब्रॉफीला पतीच्या खुनाच्या आरोपात बुधवारी अमेरिकेतील पोलिसांनी अटक केली. ६८ वर्षीय नॅन्सीचे पती डॅनियल ब्राफी यांची २ जून रोजी हत्या करण्यात आली होती. यानंतर नॅन्सीने पतीच्या आठवणीत फेसबुकवर शोक संदेश लिहिला. अनेक लोकांनी त्यांचे सांत्वन करत धीर दिला. पण पोलिसांना डॅनियल यांच्या खुनाचे पुरावे शोधले. त्याप्रमाणे आरोपी नॅन्सीच निघाली. 


नॅन्सीने प्रेमावर तसेच रहस्यमयी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तिची काही पुस्तके अॅमेझॉनवर विक्रीसाठी निवडली गेली. "पतीची हत्या कशी करावी?' या विषयावर तिने २०११ मध्ये ७०० शब्दांचा निबंध लिहिला होता. त्यानंतर यावर एक कादबंरीही लिहिण्यात आली. यात तिने उल्लेख केला होता की, "श्रृगांरिक रहस्यमयी लेखिका म्हणून हत्या आणि त्यानंतरच्या पोलिस प्रक्रियेवर मी अनेक तास विचार केला. 


यापासून वाचण्यासाठी उपायांचाही उल्लेख मी केला आहे.' हत्येच्या तुलनेत घटस्फोट अधिक खर्चिक असल्याचे नॅन्सीने आपल्या निबंधात म्हटले होते. पोलिसांनाही याद्वारेच एक सुगावा लागला आणि पुरावे जमा करण्यात आले. पोलिसांच्या मते, आवश्यक ते पुरावे जमवण्यात यश आले आहे. चौकशीदरम्यान नॅन्सी गुन्हा कबूल करेल. हत्या करताना तिने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. 


हत्येच्या तुलनेत पतीशी घटस्फोट घेणे अधिक खर्चिक 
डॅनियलची पोर्टलँडमधील स्वयंपाक घरात हत्या करण्यात आली होती. कादंबरीत नॅन्सीने हत्या करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. पोलिस अधिकारी क्रिस्टोफर जॉन यांच्या मते, हत्या करताना सूक्ष्म बाबींकडे नॅन्सीने चूक केली. एका मर्यादे पलीकडे जाऊन पोलिस विचार करू शकत नाहीत, अशी तिची चुकीची धारणा होती. सूक्ष्म गोष्टींतूनच मोठा पुरावा हाती लागत असतो. नॅन्सीच्या बाबतीत हिच बाब महत्त्वाची ठरली. नॅन्सीने एक-दोन नव्हे तर अनेक पुरावे मागे सोडल्याने तिला आता तुरुंगाची हवा खावी लागेल. 

बातम्या आणखी आहेत...