Home | National | Other State | now 72 thousand rupees will be deposited in the account which is opened by Modi

राहुल यांचा टोला : मोदी यांनी उघडलेल्या खात्यात आता ‘न्याय’चा पैसा जमा होईल

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 26, 2019, 08:52 AM IST

नोटबंदी व जीएसटी गरिबांच्या खिशातून पैसा काढण्याची पद्धत होती

  • now 72 thousand rupees will be deposited in the account which is opened by Modi
    जालौर - राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थानात जालौरमध्ये सभा घेतली. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने पाच वर्षांत लोकांवर अन्याय केला आहे. काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास सर्वांसोबत न्याय होईल. मोदींनी जी खाती उघडली होती, आता त्यात न्याय योजनेचे ७२००० रुपये वार्षिक जमा होतील. ते पुढे म्हणाले, नोटबंदी व जीएसटी गरिबांच्या खिशातून पैसा काढण्याची पद्धत होती. या दोन्ही निर्णयांमुळे लाखो नोकऱ्या गेल्या. लोक रस्यावर आले. आता आमचे सरकार शेतकरी, युवा, महिला व लहान दुकानदारांच्या मनातले ऐकेल. सर्वाना न्याय मिळेल. अदानी-अंबानी यांच्याकडचा पैसा गरिबांना वाटला जाईल.

Trending