आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशवाणीच्या बातम्या खासगी एफएमवर येणार; प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आकाशवाणीने ऐतिहासिक पुढाकार घेत आपल्या स्थापनेनंंतर प्रथमच खासगी एफ एम रेडिओ वाहिन्यांवर प्रसारण करण्याचा मार्ग मंगळवारी मोकळा केला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. 

 

राठोड या वेळी म्हणाले, खासगी एफ एम वाहिन्यांवर बातम्या प्रसारित करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. मात्र, महसुलाबाबतचा आढावा घेण्यात उशीर झाल्यामुळे अंमलबजावणीस विलंब झाला. आकाशवाणीचे महासंचालक(वृत्त विभाग) इरा जोशी यांनी सांगितले की, आकाशवाणीने खासगी एफ एम वाहिन्यांची प्रलंबित मागणी पूर्ण केली आहे. विविध पक्षांसोबत झालेल्या गहन चर्चेनंतर अटी व नियमांसोबत चाचणीच्या धर्तीवर त्यास मंजुरी दिली आहे. खासगी एफ एम वाहिन्यांना आकाशवाणीच्या बातम्या कोणत्याही बदलाशिवाय जशाच्या तशा प्रसारित कराव्या लागतील. तसेच त्या अन्य कोणासोबत शेअर करू शकणार नाहीत. 
 

बातम्या आणखी आहेत...