आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Now Abortion Can Be Done Till 24 Week, Cabinet Approves Amendment To Abortion Law

24 व्या आठवड्यापर्यंत करता येणार गर्भपात, कायदा दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : नको असलेला गर्भ आणि गर्भातील भ्रूणाचा आजार अशी समस्या असेल तर गर्भपात करणे सोयीचे व्हावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वैद्यकीय गर्भपात दुरुस्ती अधिनियम-२०२०ला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे. यानुसार, नको असलेला गर्भ काढण्यासाठी २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येईल. विशेष परिस्थितीत (बलात्कार, अपंगत्व, अल्पवयीन) हीच मुदत २४ आठवड्यांची असेल. गर्भातील भ्रूणास गंभीर आजार असल्याचे निदान झाल्यास वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्याने गर्भवती गर्भपात करू शकेल. यासाठी महिलेस कोर्टात जाण्याची गरज नाही. गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी जाहीर केले तर एक वर्षांपर्यंत कैद व दंडाची तरतुदही यात आहे.

मात्र, गर्भपातासाठी २४ आठवडे का थांबायचं?

बलात्कारपीडित, दिव्यांग किंवा अल्पवयीन गर्भवतीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकार म्हणते. बऱ्याच केसमध्ये ७ व्या महिन्यातच बाळ जन्मते. १८ व्या आठवड्यात सोनोग्राफीत बाळाची संपूर्ण स्थिती कळते. यातून तत्कालीन सरकारने २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा निर्णय घेतला. मग गर्भपातासाठी २४ आठवड्यापर्यंत का थांबायचे? -डॉ. आशा मिरगे, माजी सदस्य, राज्य महिला आयोग