आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Ajay Devgan's 'Maidan' Will Be Released On December 11, Trailer Of 'Baghi 3' Will Come Out On February 6.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता 11 डिसेंबरला रिलीज होईल अजय देवगणचा 'मैदान', 6 फेब्रुवारीला येईल 'बागी 3' चा ट्रेलर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अजय देवगणचा रीअल लाइफ स्टोरीवरून इंस्पायर असलेला चित्रपट 'मैदान' ची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे. 27 नोव्हेंबरला रिलीज होणारा चित्रपट 'मैदान' आता 11 डिसेंबरला रिलीज होईल. या बदलासोबतच अजयच्या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर समोर आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करत आहे. बोनी कपूर, झी स्टूडियोज आणि फ्रेशलाइम फिल्म्सचे प्रोडक्शन असलेला 'मैदान' 4 भाषा हिंदी, तमिळ, तेलगु आणि मल्याळममध्ये बनत आहे. 
 

सैय्यद अब्दुल रहीम यांची असू शकते कथा...

चित्रपटाच्या प्लॉटबद्दल बोलायचे झाले तर हा भारतीय फुटबॉल टीमचे यशस्वी कोच सैय्यद अब्दुल रहीम यांची कथा असू शकते. मात्र पोस्टरवरून हे स्पष्ट होत नाही, पण सैय्यद अब्दुल रहीम यांच्या प्रशिक्षणामध्येच भारतीय टीम एशियाची सर्वोत्कृष्ठ टीम बनली होती. 1951 ते 1962 च्या काळाला भारतीय फुटबॉलचे सुवर्ण युग मानले जाते. 1956 च्या मेलबर्न ओलम्पिक खेळांमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले होते. हे भारतीय फुटबॉल टीमचे सर्वात मोठे यश होते.

सैय्यद यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. ते हैदराबाद सिटी पोलिसचे कोच असण्यासोबतच टीम इंडियाचे कोचदेखील होते. मात्र त्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे 1963 मध्ये झाला होता. पण तोपर्यंत ते भारतीय फुटबॉल टीमचे कोच होते.

6 फेब्रुवारीला ला रिलीज होईल 'बागी 3' चा ट्रेलर... 

टायगर श्रॉफचा चित्रपट 'बागी' ची फ्रॅन्चायसी 'बागी 3' चा ट्रेलर 6 फेब्रुवारीला रिलीज होईल. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखदेखील आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खानने केले आहे. तसेच प्रोडक्शन साजिद नाडियादवाला आणि फॉक्स स्टार स्टूडियोचे आहे. चित्रपटाचे नवे पोस्टरदेखील रिलीज केले गेले आहे, ज्यामध्ये टायगर टॅंकसमोर उभा आहे आणि त्याच्या हातात एक गनदेखील दिसते.