आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोशल मीडिया’च्या युगात शंका लवकर दूर करणे महत्त्वाचे : नेस्ले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेवे (स्वित्झर्लंड) - सोशल मीडियाच्या या युगात कोणतीही शंका लवकरात लवकर दूर करायला हवी, असे मत “नेस्ले’ने व्यक्त केले आहे. कंपनीला २०१५ मध्ये मॅगीमुळे उभ्या राहिलेल्या संकटातून धडा मिळाला आहे. नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क श्नाइडर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना असे मत व्यक्त केले आहे. 


बाजारात स्थानिक सरकार आणि ग्राहकांशी कायम संपर्कात राहणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१५ मध्ये मॅगी नूडल प्रकरणात हेच धोरण कंपनीच्या उपयोगी आले होते.  त्यांनी सांगितले की, “छोटीशी शंकाही सोशल मीडिया आणि इंटरनेटवर तेजीने पसरते. ती तथ्यात्मक स्वरूपात नसली तरी त्यामुळे एखाद्या वस्तूबद्दल अत्यंत तेजीने धारणा तयार होते. त्यामुळे तुम्ही तेवढ्याच तेजीने प्रतिक्रिया देणेही महत्त्वाचे आहे. कारण, ही धारणा तेजीने तयार होते.’  


भारतात जून २०१५ मध्ये मॅगीत “सीसा’चे प्रमाण परवानगीपेक्षा जास्त असल्याचे आढळले होते. त्यानंतर भारतीय खाद्यान्न नियामक एफएसएसएआयने मॅगीवर पाच महिन्यांसाठी बंदी घातली होती. या संकटाची आठवण काढत श्नाइडर यांनी सांगितले की,”त्या वेळी या उत्पादनांविषयी एक हवा तयार झाली होती. त्याच वेळी आम्हाला यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. नेस्लेच्या या लोकप्रिय उत्पादनाला भारतात पाच महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. आमचे उत्पादन योग्य असल्याचे सिद्ध झाल्याने आम्ही या संकटातून लवकर बाहेर आलो’  नेस्लेसाठी भारत जगातील अत्यंत महत्त्वपूर्ण बाजारांपैकी एक आहे. नेस्ले इंडिया भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे. २०१७ मध्ये कंपनीने देशात १०,००० कोटी रुपयांच्या विक्रीचा आकडा पार केला होता.

बातम्या आणखी आहेत...