आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now, As The Railways, ST Will Now Carrier Service

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेप्रमाणे आता एसटीही करणार मालवाहतूक, गाेदामेही बांधणार; रावतेंची घाेषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एसटी महामंडळ प्रवाशांच्या वाहतुकीबराेबरच आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. 

 

महामंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. महामंडळ आता गोदामांच्या व्यवसायातही उतरणार आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढवणे आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाययोजना सध्या राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करणे आदींबाबत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या सेवा लवकरच सुरू करण्यात येतील, असे रावते म्हणााले 

 

महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. त्याआधारे रेल्वेच्या धर्तीवर एसटीचीही मालवाहतूक सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मालवाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे.

 

मालवाहतुकीसाठी एसटीची स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे ९ वर्षांनंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांत रूपांतरण केले जाईल. त्यास परिवहन विभागाची मान्यता घेण्यात येईल. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून हा प्रस्ताव लवकरच अंतिम करण्यात येईल. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचे मालवाहतूक साधन मिळेल, असे रावते म्हणाले. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महामंडळाचे अधिकारी अशोक फळणीकर आदी उपस्थित होते. 

 

तीन हजार बसेसद्वारे हाेणार मालवाहतूक 
- एसटी मालवाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित आहे. यासाठी ३ हजार जुन्या प्रवासी बसेसचे मालवाहतूक वाहनांत रूपांतर करण्यात येईल. काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. 
- राज्यातील ३०१ ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील. तीन टप्प्यांमध्ये या गोदामांची बांधणी करून ती लोकांसाठी आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. 
- मालवाहतूक आणि गोदामे यांचे संनियंत्रण करण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार असून स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.