आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विचार करूनच TV चॅनल बदला, त्याच तंत्रज्ञानाने आवाजही कमी- जास्त करता येईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को -  टीव्हीचा रिमोट एखाद्या जागी ठेवून विसरला असाल किंवा खराब झाला असेल तर चिंता करण्याची अावश्यकता नाही. तुम्ही तुमच्या मेंदूच्या मदतीने टीव्ही नियंत्रित करू शकाल असे तंत्रज्ञान असलेला टीव्ही लवकरच येत आहे. म्हणजे चॅनल बदलण्याचा विचार करताच तुमचे चॅनल बदलले जाईल. आवाजही कमी-जास्त करता येईल. दक्षिण कोरियाई इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने या टीव्हीचा प्रोटोटाइप तयार केला आहे.

 
कंपनीने या प्रकल्पाला पोंथियस असे नाव दिले आहे. कंपनी स्वित्झर्लंडच्या “सेंटर ऑफ न्यूरोप्रोस्थेटिक्स’सोबत या तंत्रज्ञानावर काम करत आहे. गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या विकासकांच्या परिषदेमध्ये या टीव्हीचा प्रोटोटाइप सादर करण्यात आला होता. गंभीर शारीरिक अक्षमता असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत न घेता आवडती मालिका किंवा शो दाखवण्यासाठी मदत करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 


क्वाड्रिप्लेजियाग्रस्त (हात-पायाने अक्षम) लोकांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिक रिकार्डो कॅव्हेरियागा यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान अत्यंत किचकट असले तरी तेवढेच इंटेलिजंटदेखील आहे. मनुष्याच्या मेंदूशी जोडले जाऊन त्यासंदर्भात काम करण्यासाठी याला तयार करण्यात आले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. दर्शकाला टीव्हीसोबत जोडण्यासाठी ही प्रणाली ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) चा वापर करते. बीसीआय ६४ सेन्सर आणि डोळ्यांची हालचाल ट्रेकर याच्या हेडसेटवर 
अवलंबून असते. 


चित्रपट पाहत असताना आपला मेंदू कशा प्रकारे काम करतो, हे तपासण्यासाठी सध्या तरी मेंदूचे तरंग जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार या प्रणालीला विकसित करून अशा पद्धतीने तयार केले जाईल. त्यामधून मेंदूतील तरंगांचा वापर करून आणि डोळ्यांच्या हालचालींमधून निश्चिती मिळवण्याचे काम हे तंत्रज्ञान करेल. एका वेळी सिलेक्शन केल्यानंतर हे सॉफ्टवेअर युजरचे प्रोफाइल तयार करते आणि भविष्यात त्याला सल्लाही देते. सध्या सेन्सर असलेले हेडसेट घालण्याआधी डोक्यावर जेल लावावे लागते. त्यामुळे सध्या तरी हे अवघड किंवा किचकट वाटत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी करण्यावर कंपनी काम करत आहे. या नव्या प्रणालीच्या माध्यमातून युजर सरळ मेंदूच्या तरंगांच्या माध्यमातून टीव्हीसोबत सोडला जाईल.  

 

अलिबाबाच्या स्मार्ट स्क्रीनमुळे दृष्टिहीनही करतील ऑनलाइन शॉपिंग  
चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी अलिबाबाने स्मार्ट स्क्रीन तयार केली असून, यात तीन सेन्सरयुक्त बटण दिलेले आहेत, जे ब्रेल लिपीसारखे आहेत. यांच्या मदतीने दृष्टिहीन शॉपिंग, पेमेंट करण्याबरोबरच फोनवर उत्तर देऊन मेसेज ऐकण्यासारखे काम करू शकतील. कंपनीने तिंग्शुआ विद्यापीठासोबत मिळून विशिष्ट प्लास्टिक स्ट्रिप तयार केली आहे. ही स्मार्टफोनवर चिकटते. त्यावर लावण्यात आलेले तीन बटण दाबल्यानंतर सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या कमांड जशा की, गो, बॅक आणि कन्फर्म ऑपरेट होतात. स्मार्ट टचला कानावर ठेवल्यानंतर युजर मेसेजला व्हॉइस फॉर्मेटमध्येही एेकू शकतो.

बातम्या आणखी आहेत...