आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलचे नवीन फीचर: आता चॅटिंग करताना कार्टून इमोजीऐवजी स्वतःच्या फोटोचा इमोजी करा शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क: सोशल मीडिया यूजर्ससाठी एक इंट्रेस्टिंग बातमी आहे. जी-बोर्डच्या मदतीने तुम्ही आता आपल्या आवडीचे स्टीकर्स क्रिएट करु शकता. मिनी स्टीकर्स नावाचे हे फीचर आता तुमच्या एका सेल्फीने तुम्हाला एक अॅनिमेटेड कॅरेक्टरमध्ये बदलू शकते. यापुर्वी बिटमोजीच्या मदतीने आयओएस यूजर्स पहिलेही असे करु शकत होते, परंतू आता अँड्राइड यूजरही मिनी स्टीकर्सचा वापर करु शकतील, जे खुप मजेदार आहे. 


कसे करते काम?
गूगलचे मिनी स्टीकर्स सेल्फीने तुमचा कार्टून कॅरेक्टर किंवा इमोजी बनवण्यासाठी मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स आणि आर्टिस्टच्या इलस्ट्रेशन्सचा वापर करते. यावेळी तुमचा स्किन टोन, चेह-याचा आकार, हेयरस्टाइल, डोळ्यांवर विशेष लक्ष दिले जाते. तुम्ही स्टीकर्स कस्टमाइजही करु शकता. या पुर्ण प्रोसेसमध्ये 30 सेकंद लागतात. 


असा करावा वापर 
- सर्वात पहिले फोनमध्ये जी-बोर्ड ओपन करा.
- यानंतर इमोजी बटनवर टॅप करा आणि नंतर स्टीकर्स आयकॉन सिलेक्ट करुन मिनी आयकॉनवर टॅप करा. 

- शेवटी क्रिएट बटन दाबा आणि सेल्फी घ्या.
- यानंतर गूगलच्या क्रिएशन अॅक्सेप्ट करु शकता. आवडले नाही तर कस्टमाइजही करु शकता.
- आता तुम्ही हे स्टीकर्स बोल्ड आणि स्वीट सारख्या फ्लेवर्ससोबत कुणासोबतही शेअर करु शकता. 

 

बातम्या आणखी आहेत...