gadget / आता गुगल असिस्टंट होणार खूप स्मार्ट; व्हॉट्सअॅप व टेलिग्रामचे मेसेज वाचून दाखवेल

युजर्स तोंडी मेसेज देऊ शकतील, अशी सुविधा
 

दिव्य मराठी

Aug 08,2019 10:07:00 AM IST

वॉशिंग्टन - गुगल असिस्टंट आजवर मोबाइलवर एसएमएस व हँगआऊटवर आलेले मेसेज वाचून दाखवत होता. परंतु तो आता आणखी स्मार्ट झाला आहे. असिस्टंट आता व्हॉट्सअॅप व टेलिग्राम यासारख्या अॅपवर आलेले मेसेज वाचून दाखवेल. युजर तोंडी सांगूनही मेसेजचे उत्तर देऊ शकतील. समोरील व्यक्तीस ब्लॉकही करू शकतील. जर मेसेजमध्ये आलेले फोटो, व्हीडिओ अथवा ऑडिओ फाइल्स असतील तर असिस्टंट युजरला सांगेल की, मेसेजमध्ये फाइल आहे. मात्र, असिस्टंट ती फाइल उघडणार नाही. असिस्टंटला परवानगी देण्यासाठी युजरला “रीड माय मेसेज’ असा संदेश द्यावा लागेल. त्यानंतर असिस्टंट तो मेसेज वाचून दाखवेल. हे फीचर युजर वाहन चालवत असताना किंवा मोबाइल हातात घेण्याच्या स्थितीत नसेल तर खूप उपयुक्त ठरेल. तो अनेक भाषांत काम करेल. या फीचरचा वापर करण्यासाठी सर्व्हरकडून अपडेट मिळेल की नाही अथवा लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल, याची पुष्टी झालेली नाही.

X