ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आता राज्यात रंगणार शक्य-अशक्यतांचे राजकारण
सर्वोच्च न्यायालयात :
- 1. सरकार अजित पवारांनी दिलेले राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र न्यायालयात सादर करेल.
- 2. हा पुरावा न्यायालयास पटल्यास न्यायालय विरोधकांची याचिका रद्द करू शकतात
- 3. हा पुरावा पटला नाही तर न्यायालय तत्काळ बहुमत सिद्ध करण्याचे आदेश फडणवीसांना देतील
- 4. राज्यपालांच्या भूमिकेबाबत १९९४ चा एस आर बोम्मई खटला, २००६ चा रामेश्वर प्रसाद खटला आणि कर्नाटकातील येदियुरप्पा यांचा खटला याचा आधार घेतला जाईल.
- 5. ३० नोव्हेंबर ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तारीख राज्यपालांनी दिलेली असल्याने, त्या दिवशी चित्र स्पष्ट होईलच असाही निकाल देऊ शकतील.
विधानसभेत....
- 1. येत्या ३० नोव्हेंबरपूर्वी राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांना हंगामी अध्यक्षांची निवड करावी लागेल.
- 2. निवडून आलेल्या आमदारांपैकी सर्वात ज्येष्ठ सदस्याची या पदासाठी निवड करण्याचा विचार राज्यपाल करू शकतात.
- 3. हंगामी अध्यक्ष हे निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.
३० नोव्हेंबर : शक्यता १
- 1. शपथ घेतलेले आमदार सभागृह अध्यक्षाची गुप्त मतदान करून निवड करतील.
- 2. भाजपचे बहुमत सिद्ध झाले तर अजित पवारांचे बंड यशस्वी झाले असे समजावे लागेल.
- 3. त्यासाठी अजित पवारांना २६ आमदारांचा पाठिंबा लागेल.
- 4. तेवढे आमदार न आल्यास भाजपकडे बहुमत नाही हे अध्यक्ष निवडीतच सिद्ध होईल.
- 5. विश्वासदर्शक ठराव बारगळल्यास फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल.
शक्यता २
- 1. राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने नियुक्त केलेले गटनेते जयंत पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर केला जाईल.
- 2. तो त्यांनी मंजूर केला तर जयंत पाटलांचा व्हीप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल.
शक्यता ३
- 1. राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते जयंत पाटील यांची नियुक्ती अध्यक्षांनी अवैध ठरवली तर अजित पवार यांचा व्हीप राष्ट्रवादीच्या आमदारांना पाळावा लागेल.
- 2. ५० हून अधिक आमदार राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याने अजित पवारांचा व्हीप, विरुद्ध आमदारांची भूमिका याबाबतचा कायदेशीर पेच निर्माण होईल.
शक्यता ३
- 1. राष्ट्रवादीतील दोनतृतीयांश म्हणजे ३६ आमदार सोबत असल्याचे अजित पवार यांना सिद्ध करावे लागेल.
- 2. अन्यथा अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार रद्द होऊ शकते. त्यांना पुन्हा निवडून यावे लागेल.
शक्यता ४
- 1. देवेंद्र फडणवीस सभागृहात बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकेल.
- 2. पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून अजित पवारांवर आमदारकी गमावण्याची वेळ येऊ शकते.
क्यता ५
- 1. आज राष्ट्रवादीत असल्याचे जाहीरपणे सांगणारे काही आमदार प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहण्यासारख्या पळवाटा शोधून भाजपला मदत करू शकतात.
- 2. पडद्यामागील हा घोडेबाजार खेळण्यात भाजप यशस्वी झाले तर ते सभागृहात त्यांचे बहुमत सिद्ध करू शकतात.
- 3. तसे झाले तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार
- टिकू शकेल.
शक्यता ६
- 1. घोडेबाजार यशस्वी झाला नाही आणि शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस हे पक्ष आपापले आमदार राखण्यात यशस्वी झाले तर भाजप सरकारविरुद्ध विरोधकांकडून अविश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
- 2. आणि शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार राज्यात येईल.
शक्यता ७
- 1. महाविकास आघाडीचे सरकार आले तर संधी मिळताच आमदार फोडण्याचे व ते पाडण्याचे प्रयत्न विरोधक म्हणून भाजप करत राहील.
- 2. कर्नाटकाप्रमाणे आमदार फोडण्यात त्यांना यश आले तर महाविकास आघाडीचे सरकारही पडू शकते.
- 3. नंतर कोणताही पक्ष सरकार चालवू शकत नाही हा अहवाल देऊन राज्यपाल पुन्हा राष्ट्रपती राजवट आणि पुढे मध्यावधी निवडणुका लागू शकतात.