आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मनोरुग्णांना विम्याचे कवच; आयआरडीएआयच्या विमा कंपन्यांना कारवाई करण्याच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मनोरुग्णांवर व्यवस्थित उपचार करता यावेत, यासाठी विम्यांचे सुरक्षा कवच दिले जाणार आहे. विमा कपंन्यांना मानसिक आरोगय कायदा लागू करण्यात आला आहे. सामान्य आजारासाठी विमा पॉलिसीव्दारे उपचार केले जातात. आता मानसिक आरोग्य कायद्यानुसार मनोरुग्णांवर विम्याव्दारे उपचार होतील. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना दिल्या आहेत. 


मानसिक आरोग्य कायदा २०१७ हा २९ मे रोजी संमत झाला आहे. त्यात म्हटले आहे की, 'विविध शारीरिक आजारांसाठी विम्यातून संबंधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यानुसार मनोरुग्ण अथवा मानसिक आजारावर, तणावाखाली असलेल्या रुग्णांवर उपचार व्हावेत.' २०१७ मध्ये हा कायदा तयार झाला. त्यानंतर वर्षानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. पूर्वी मानसिक आजारावर प्राथमिक स्वरूपाच्या काळात काही विमा कंपन्याकडून सवलत मिळायची. मात्र मनोरुग्णांवर वर्षाेनवर्षे उपचार केले जातात. त्यालाही विम्याचे कवच मिळाल्यामुळे अनेक रुग्नांना दिलासा मिळाला आहे. 


या असतील अडचणी 
काही मनोरुग्णांवर वर्षानुवर्षे उपचार करावे लागतात. त्यामुळे विमा द्यायचा कसा किंवा त्याचे मोजमाप करायचे कसे, हा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. विमा कंपन्यांनी अजून तरी कोणत्याही योजना जाहीर केल्या नाहीत. 


लाखो रुग्णांना विम्याचा होणार लाभ 
अनेक मनोरुग्णांकडे उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. उपचार खर्चिक असतात. पैसे नसल्याने चांगल्या उपचारांना रुग्ण मुकायचे. या विम्यामुळे लाखो रुग्णांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे. पैशाअभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत. दर्जेदार सेवा व उपचार मिळू शकतील. 


दर्जेदार सेवा मिळण्यात मदत 
मानसिक आरोग्य कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मनोरुग्णाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे. मानसिक आजारावरील उपचार हे महागडे आहेत. पैशाअभावी अनेकांवर उपचार होत नाहीत. त्यांनाही दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार आहे. परंतु विमा कंपन्यांकडून पॉलिसी जाहीर केलेली दिसून येत नाही.

- डॉ. प्रसन्न खटावकर, मानसोपचार तज्ञ 

बातम्या आणखी आहेत...