आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी छेड प्रकरणानंतर धडा, जैन साध्वी घेताहेत आता स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत -‘अहिंसा परमो धर्म:’चा मूलमंत्र धारण करणाऱ्या जैन साध्वी आता स्वसंरक्षणाचे धडे घेत आहेत. सुरतच्या गोपीपुरात ९ नाेव्हेंबरला एका साध्वीची छेड काढल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ५० साध्वींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यात २० वर्षांपासून ५० वर्षांपर्यंत वयाच्या साध्वी आहेत. जीवन कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अाशित गांधी म्हणाले, देशात बहुतेक प्रथमच इतक्या साध्वी आत्मरक्षेचे धडे गिरवत आहेत. जैन साधू-साध्वी सुरक्षा सेलकडून राष्ट्र सेविका समितीच्या महिला त्यांना प्रशिक्षण देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...