आता मुले शिकणार / आता मुले शिकणार ए फॉर अर्जुन.. कांची कामकोटी पीठाचा नवा अभ्यास

विशेष प्रतिनिधी

Nov 08,2018 09:24:00 AM IST

रांची - आतापर्यंत मुले ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल व सी फॉर कॅट.. अशी वर्णाक्षरे शिकत होते. पण लवकरच ते ए फॉर अर्जुन, बी फॉर ब्रह्मा व सी फॉर कावेरी अशी वर्णाक्षरे शिकतील. कांचीपुरम येथील पीठात शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. नव्या अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख पटलेली नाही.


यासाठी पीठाने भारतातील नद्या, रामायण, महाभारत व वेदांतील पात्रांचा या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. नीता प्रकाशन, दिल्ली व कांची कामकोटी पीठाने या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या पीठातील शाळांसह दक्षिण भारतातील अनेक शाळांमधून हा अभ्यास शिकवला जातोय. झारखंडमध्येही पीठाने शिक्षण, आरोग्य व वेदांशी संबंधित प्रकल्पाची सुरूवात केली आहे. या पुस्तकांना झारखंड पीठाद्वारे संचलित शाळांमध्ये शिकवण्यात येईल, हिंदी वर्णाक्षरांची ओळख करून देतानाही क से कर्ण, ज से जरासंध, इ से इंद्र, ई से ईश्वर, उ से उमा, ऋ से ऋग्वेद असे शंकराचार्यांनी सांगितले.


इंग्रजीतील गोल्डन रीडरमध्ये वाचतील : ए फॉर अर्जुन, बी फाॅर ब्रह्मा, सी फॉर कावेरी, डी फॉर दुर्गा, इ फॉर एकलव्य, जी फॉर गणेश, एच फॉर हरि (शंकर), आय फॉर इंडिया, आदी.

X
COMMENT