Home | Maharashtra | Vidarva | Akola | Now Muslims will protest for reservation

आता मुस्लिम काढणार अारक्षणासाठी माेर्चा; नियोजन सुरु

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 01:16 PM IST

मराठा अारक्षणासाठी जिल्ह्यात जनअांदाेलन सुरु असतानाच अाता मुस्लिम अारक्षणासाठी मुक माेर्चा काढण्यात येणार अाहे. यासाठी अ

 • Now Muslims will protest for reservation

  अकाेला- मराठा अारक्षणासाठी जिल्ह्यात जनअांदाेलन सुरु असतानाच अाता मुस्लिम अारक्षणासाठी मुक माेर्चा काढण्यात येणार अाहे. यासाठी अकाेला मुस्लिम समाजातील काहींनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा माेर्चा १७ आॅगस्टला निघणार अाहे.


  अापल्या न्याय्य हक्कांसाठी अाता मुस्लिम समाज सज्ज झाला अाहे. काही दिवसांपूर्वी तत्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाविरुद्ध सामाजिक संघटनांतर्फे अांदाेलन करण्यात अाले हाेते. विधेयकाचे कायद्यात रूपांतर हाेण्याच्या प्रक्रियेत िवराेधी पक्ष शांत राहिल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशाराही संघटनांकडून देण्यात अाला हाेता. हे विधेयक लोकसभेत २८ डिसेंबर राेजी बहुमताने मंजूर करण्यात आले हाेते. दरम्यान अाता मुस्लिम समाज अारक्षणाच्या मुद्द्यावरून एकवटणार अाहे.


  काय अाहेत त्या समित्यांच्या शिफारशी
  मुस्लिम अारक्षणाबाबत डाॅ. महमूद उर रहमान व रंगनाथ मिश्रा समित्यांच्या शिफारशींबाबत उल्लेख करण्यात अाले अाहे. डाॅ. महमूद उर रहमान समितीने ८ ते १० टक्के आणि रंगनाथ मिश्रा समितीने १० टक्के अारक्षणाची शिफारस केली हाेती. त्यामुळे अाता या दाेन्ही समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजही अाता अारक्षणाची मागणी लावून धरणार असल्याचे समजते.


  सात सदस्यांची समिती
  मुस्लिम अारक्षणाच्या मुद्द्यावर सात सदस्यीय समिती गठित करण्यात अाल्याची माहिती अाहे. राजकीय, सामाजिक संघटनांमधील पद बाजूला ठेवून केवळ अारक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित व्हा, असे अावाहन मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी केले. त्यानुसार समिती कार्यरत असून लवकरच इतरही बाबी जाहीर हाेणार अाहेत.


  उलेमांची लवकरच होणार आता बैठक
  मुस्लिम अारक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच उलेमांची बैठक हाेणार असल्याचे समजते. या बैठकीत अारक्षणासह इतरही मुद्द्यांवर चर्चा हाेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा निश्चित हाेणार अाहे. धरणे, जाहीर सभा, जनजागृती बैठका यापैकी काेणत्या पद्धतीने हा मुद्दा लावून धरायचा यावर या बैठकीत निर्णय हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे

Trending