आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर किलर्सनंतर आता येथे लागणार टायर बॅरिअर, चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना बसणार वचक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : चुकीच्या दिशेने चालणारी वाहनांमुळे अपघाताची शक्यता असते. हे थांबविण्यासाठी अनेकर प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहेत.  चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसीठी अनेक शहरांत टायर किलर्सचा उपयोग होत आहे. यामुळे वाहनांचे टायर पंचर होतात. पण याबाबत येणाऱ्या तक्रारींमुळे आता नोएडात टायर बॅरिअर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


येथे बसवण्यात येणार टायर बॅरिअर 

नोएडा प्राधिकरने चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी सर्वात पहिले सेक्टर 50 मध्ये टायर बॅरिअर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन दिवसांत हे काम सुरु होणार आहे. हे बॅरिअर टायरला जागेवरच थांबवेल. याची स्पाइक 4 इंच लांब आणि 60 डिग्रीच्या अँगलचे असणार आहेत. हे टायर बॅरिअर लावण्यासाठी प्राधिकरणाला एक रूपयाही खर्च करावा लागणार नसल्याचे टायर बॅरिअर लावणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 


इतर सेक्टरमध्येही लावणार टायर बॅरिअर
टायर बॅरिअर लावणारी स्वीडिश कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्टर 50 मधील प्रयोगानंतर इतर सेक्टरमध्येही टायर बॅरिअर लावण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेमध्ये या बॅरिअरची निर्मिती झाली आहे. तेथील लष्कारासाठी या बॅरिअरचा उपयोग होत होता. 


टायर किलर्सला झाला होता विरोध

नोएडाच्या सेक्टर 77 मध्ये टायर किलर्स लावले होते. पण चुकीच्या दिशेने जाणारे वाहने सहजच यावरून जात होते. यामुळे वाहनचालकांनी याचा विरोध दर्शवला होता. काही चालकांनी टायर किलर्सच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित केले होते. वाढता विरोध लक्षात घेता हे टायर किलर्स हटविण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...