Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Now police help by WhatsApp, Facebook and Twitter

व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरद्वारेही घेऊ शकाल आता पोलिसांची मदत; कुठल्याही तक्रारी नोंदवा आॅनलाइन

संजय जाधव | Update - Aug 13, 2018, 11:25 AM IST

अप्रिय घटना, महिला, तरुणींना सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास अथवा छेडछाड याची माहिती पोलिसांना अाता व्हॉट्सअॅपवर देऊ शकता.

 • Now police help by WhatsApp, Facebook and Twitter

  सोलापूर- आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अप्रिय घटना, महिला, तरुणींना सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास अथवा छेडछाड याची माहिती पोलिसांना अाता व्हॉट्सअॅपवर देऊ शकता. शिवाय, पोलिस अायुक्तालयाने एक फेसबुक पेजही तयार केले आहे. ई-मेल, ट्विटरद्वारेही ऑनलाइन तक्रारी नोंदवू शकता. त्यासाठी शहर पोलिस नियंत्रण कक्षात खास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्काळ मदत करण्यासाठी उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत.


  या शिवाय मंगळसूत्र पळवणे, मोबाइल, पाकीट पळवणे, सोन्याचे दागिने पॉलिसच्या बहाण्याने पळवणे, सहप्रवासी म्हणून पैसे, दागिने पळवणे, सायबर सेलचे गुन्हे, बँका अथवा आर्थिक संबंधित फसवणूक अथवा गुन्ह्यांची माहिती व सोलापूर पोलिसांच्या वेबसाइटवर, नियंत्रण कक्ष, फेसबुक पेज याद्वारे बसल्या ठिकाणी माहिती देऊ शकता. तातडीची मदत म्हणून पाच ते सात मिनिटांत पोलिस आपल्यापर्यंत पाेहोचू शकतात.

  > www.solapurcitypolice.gov.in/ Â https:/www.facebook.com/SolapurCityPolice/ Â

  > https:/twitter.com/solapurpolice


  अप्रिय प्रसंग आल्यास करा तक्रार, अशी मिळते मदत
  शाळा, कॉलेजात जाणाऱ्या मुली, तरुणी, बाजारपेठांमध्ये होणारी महिलांची छेडछाड, बस अथवा सार्वजनिक ठिकाणी होणारी मुलींची छेडछाड याची माहिती व्हॉट््सअॅप नंबर अथवा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनीवर दिल्यास मदत मिळू शकते. नियंत्रण कक्षात यासाठी खास पोलिस नेमण्यात आले आहेत. हे पोलिस जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून आलेल्या कॉलची माहिती घेतात. त्याआधारे संबंधित पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल, दामिनी पथक, पेट्रोलिंग पथकाला माहिती देतात. अवघ्या पाच मिनिटांत हे पथक घटनास्थळी पोहोचण्याची व्यवस्था करतात. अन्य घटनांची माहितीही फेसबुक पेज अथवा ई-मेलद्वारे देऊ शकता. फिर्याद अथवा तक्रार देऊ शकता. त्याची खातरजमा करून पोलिस कारवाई करतील. महिन्याकाठी २५ ते ३० तक्रारी प्राप्त होतात. त्याचे निराकरण होते. तसेच अन्य माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाला ३०० ते ४०० फोन कॉल नियमित येतात.


  पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणतात...
  शाळकरी व महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड होत असेल तर घाबरून जाऊ नका. आम्हाला माहिती द्या. त्यावर कारवाई करू. बसमधून अथवा रस्त्यावरून जाताना असे अप्रिय प्रकार घडल्यास मला वैयक्तिक सांगा. साध्या वेशात आमचे पथक नेमू. जागेवरच कारवाई करण्यात येईल. त्यासाठी २९ बीट मार्शल, आठ दामिनी पथक, २६ पेट्रोलिंग पथक सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आहेत. जीपीएस यंत्रणा आहे. शाळा, कॉलेज सुटण्याच्या व भरण्याच्या वेळा आमच्याकडे आहेत.


  पोलिस आयुक्त महादेव तांबडे म्हणतात..
  व्हॉट््सअॅपच्या माध्यमातून आम्हाला माहिती देऊ शकता. अथवा फोनही करू शकता. वेळप्रसंगी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. महिला व तरुणी व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांकडे तक्रार देऊ शकतात.


  काय माहिती द्याल...
  १. फेक कॉल्समधून येणारी माहिती, त्याचा तपशील
  २. सोशल मीडियाचा वापर करताना होणारा गैरप्रकार
  ३. बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या वापराची माहिती
  ४. ऑनलाइन खरेदी करताना झालेल्या फसवणुकीचा प्रकार
  ५. नियमित वेळेत हॉटेल बंद न झाल्याची तक्रार
  ६. एटीएम, डेबिट कार्डद्वारे होणारी फसवणूक
  ७. अफवा पसरवणारे संदेश आणि व्यक्तींची माहिती

Trending