आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीला बसेल आळा; रेल्वे पोलिसांच्या वर्दीवर कॅमेरे, ३६ गाड्यांवर नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रवाशांनो आता धावत्या गाडीत तुमच्यावर रेल्वेची नजर राहणार आहे. रेल्वेत वाढणाऱ्या गुन्हेगारीबरोबरच प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासन आता गाडीत प्रवाशांना संरक्षण देणाऱ्या आरपीएफ कॉन्सटेबलच्या वर्दीवर बॉडीवॉर्म कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला. जानेवारीत सोलापूर आरपीएफला २६ कॅमेरा मिळणार आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरपीएफ जवान सोलापूर विभागातील ३६ गाडीमध्ये देखरेख ठेवणार आहेत. आता गाडीच चित्रीकरण होणार असल्याने गुन्हेगारीलाही आळा बसणार आहे. 

 

भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच आरपीएफ कॉन्स्टेबलच्या शर्टवर छातीजवळच्या भागात बॉडी कॅमेरा बसवण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेतील अहमदाबाद विभागात सर्वप्रथम याची सुरुवात झाली. अहमदाबाद -दिल्ली दरम्यान धावणा ऱ्या सुवर्णजयंती राजधानी एक्स्प्रेसमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अन्य विभागात देखील त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. सोलापूर आरपीएफला मध्य रेल्वे मुख्यालयाकडून २६ कॅमेरे दिले जाणार आहेत. याचा वापर केवळ प्रवाशांच्या भांडणासाठीच नाही तर रेल रोको, रेल्वे संदर्भातील एखाद्या घटनेचे चित्रण करण्याबरोबरच आरपीएफ कर्मचारी हा काम करतो की नाही, हे तपासण्यासाठी देखील होणार आहे. युरोपीय रेल्वेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे संदर्भातील गुन्हे देखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.

 

एका कॅमेऱ्याची किंमत सुमारे ३८ हजार रुपये इतकी आहे. सोलापूर विभागात अनेकदा रेल्वेवर दगडफेक अथवा दरोड्याचे प्रसंग घडलेले आहेत. प्रवाशांकडून आरपीएफ हे त्या डब्यात नव्हते किंवा गाडीला संरक्षण असताना देखरल आरपीएफ गाडीत चढलेच नाहीत, असा अारोप करतात. अशा घटना टाळण्यासाठीच रेल्वे प्रशासनाने बॉडी कॅमेरा बसवला आहे. त्यामुळे एक प्रकारे त्या कॉन्स्टेबलवर देखील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यातून किमान ३० ते ४० फूट अंतरावरचे देखील चित्रण होण्यास मदत होणार आहे. शिवाय कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कॉन्स्टेबलकडून झाल्यास त्याचीही नोंद होणार आहे. 

 

पोफळज, पारेवाडी, जिंती रोड, स्थानकावर कॅमेरा व हायमास्ट 
कुर्डुवाडी ते दौंड स्थानकादरम्यान असलेल्या संवेदनशील स्थानकाच्या होम सिग्नलवर स्टॅन्ड अलोन कॅमेरा बसविण्यात येणार आहे. तसेच हायमास्ट दिवे देखिल बसवले जाणार आहेत. यात पोफळज, पारेवाडी, जिंतीरोड, ढवळस, केम आदी संवेदनशील स्थानकांचा समावेश असणार आहे. यासाठी ५० ते ५५ लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापर्यंत सर्व स्थानकावर स्टॅन्डअलोन कॅमेरा व दिवे बसवले जातील. 

 

सुरक्षेसाठी रेल्वेचा निर्णय 
आरपीएफ विभाग आता मॉडर्न होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्त, सोलापूर आरपीएफ 

बातम्या आणखी आहेत...