आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता खासगी कंपन्या चालवू शकतील रेल्वे; पिल्लई यांनी मांडला प्रस्ताव  

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तोट्यातील रेल्वेला आता खासगी कंपन्यांकडे सोपवले जाऊ शकते. मालवाहतुकीनंतर आता प्रवासी वाहतुकीचीही दारे खासगी क्षेत्राच्या भागीदारीसाठी उघडण्यावर रेल्वे खाते विचार करत आहे. त्यानुसार खासगी ऑपरेटर्सना रेल्वेची वाहतूक, त्याचे भाडे, खासगी टर्मिनल उभारणे व इतर सर्व प्रवासी सेवा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. 

 

रेल्वेच्या संशोधन व व्यवस्थापन केंद्राच्या एका परिषदेत रेल्वे बोर्डाचे सदस्य गिरीश पिल्लई यांनी हा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, खासगी ऑपरेटर्सना रेल्वेची वाहतूक करू देण्याबाबत रेल्वेचे विशेषज्ञ व उच्चाधिकारी विचार करत आहेत. रेल्वे ही सेवा क्षेत्रातील तोट्याचा सौदा आहे. मोजक्याच रेल्वे नफ्यात, तर उर्वरित तोट्यात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...