आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Now Rangoli Targets Deepika Padukone, Wrote 'dancing In Depression Video Like Marriage'

आता रंगोलीने साधला दीपिकावर निशाणा, लिहिले - 'डिप्रेशन व्हिडिओमध्ये वरात्यांसारखे नाचत आहेत..'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगनाला भले 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या मेकर्सने कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून रोखले आहे, पण तिची बहीण रंगोली मात्र अजिबात शांत नाही. रंगोलीने एका ट्वीटमध्ये दीपिका पदुकोणला टार्गेट करून लिहिले आहे, 'हे ते लोक आहेत ज्यांना मेंटल वर्डपासून प्रॉब्लम होता, पण डिप्रेशन व्हिडिओमध्ये वरात्यांसारखे नाचत आहेत.

 

सतत निशाण्यावर आहेत सेलेब्रिटी... 
रंगोलीने पहिले वरुण धवन आणि नंतर तापसी पन्नूला 'जजमेंटल है क्या' चे कौतुक करताना कंगनाचे नाव न लिहिल्यामुळे ट्वीट करून सुनावले होते. मात्र तापसीवर निशाणा साधल्यानंतर रंगोलीला समजावण्यासाठी अनुराग कश्यप यांना पुढारी यावे लागले. 

 

तापसीने केले होते ट्रेलरचे कौतुक... 
तापसीने आपल्या ट्विटरवर लिहिले, 'हे खूपच कूल आहे !!!! यांच्याकडून नेहमीच जास्त अपेक्षा होत्या आणि पूर्णपणे पैसा वसूल आहे!' तापसीने केलेल्या या कौतुकाच्या बदल्यात तापसीला मात्र वेगळेच काहीतरी मिळाले. रंगोलीने तापसीच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले, 'काही लोक कंगनाला कॉपी करून आपले दुकान चालवतात, मात्र लक्ष द्या, ते कधीच तिच्याकडे लक्षपूर्वक पाहात नाहीत आणि तिच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक करताना तिचे नावही घेत नाही. यापूर्वी जेव्हा मी तापसीजीला बोलताना ऐकले होते तेव्हा ती म्हणत होती की, कंगनाला दुप्पट फिल्टरची गरज आहे आणि तापसीजी तुम्ही स्वस्त कॉपी होणे बंद केले पाहिजे.'

 

रंगोलीने केली त्याची चेष्टा... 
कंगनाची मॅनेजर आणि तिची बहीण रंगोली चंदेलने वरुणच्या ट्वीटवर कमेन्ट करून लिहिले, "कंगनाचेही नाव लिहायचे असते सर, तीही कुणाची मुलगी आहे, तिनेही मेहनत केली आहे." वरुणनेही याचे उत्तर दिले, "ट्रेलरमध्ये सर्वाना पाहून मजा येत आहे सतीश सर, हुसैन, राज आणि विशेषतः कंगना, लीड कास्टचा तोच अर्थ होता मॅम. तुम्हाला शुभेच्छा..." 

बातम्या आणखी आहेत...