Bollywood / सुशांत सिंग राजपूत स्टारर चित्रपट 'पानी' यशराजसोबत नाही, आता शेखर कपूर स्वबळावर बनवणार हा चित्रपट 

यशराज बनवू इच्छित नाही 'पानी' : शेखर

 

दिव्य मराठी

Jun 02,2019 02:45:29 PM IST

बॉलिवूड डेस्क : मिस्टर इंडिया आणि ‘बैंडिट क्वीन’ सारखे हिट चित्रपट बनवलेले नॅशनल अवॉर्ड विनर फिल्ममेकर शेखर कपूर मागच्या काही दिवसांपासून फिल्म ‘पानी’ वर काम करत आहेत. या फिल्मविषयी लेटेस्ट डेव्हलपमेंट ही आहे की, आता यशराज याच्या पोस्टरमध्ये नाही. शेखर आता हा चित्रपट एकटाच स्वबळावर बनवणार आहे.

यशराज बनवू इच्छित नाही 'पानी' : शेखर
अशातच त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आता मी 'पानी' पुन्हा जोमाने काम करणार आहे. या चित्रपटाला यशराजसोबत बनवायला निघालो होतो पण ते लोक हा चित्रपट बनवू इच्छित नाही तर आम्ही लवकरच बसून यावर काही तोडगा काढणार आहोत. त्यांना म्हणणार आहे कि, आपला भाग सोडण्याचे काय घ्याल ? कारण आता तर मी हा चित्रपट बनवणारच आहे. शेखरच्या या वक्तव्यावर आतापर्यंत यशराजकडून कोणतेच अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

मेन लीडमध्ये असेल सुंशात...
शेखर हा चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत बनवू इच्छितो. खरे तर हा चित्रपट बनवण्याचे प्रयत्न मागच्या चार वर्षांपासून सुरु आहेत. शेखर म्हणतो, ‘मला वाटते की, सुशांतदेखील आता व्यस्त झाला आहे. होऊ शकते की, सिच्युएशन थोडी बदलेल पण मी ते पाहत आहे. आम्ही लवकरच काहीतरी अनाउंसमेंट करणार आहोत.’

X