आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आता मिशन 'मुंबई मनपा', एकहाती सत्ता मिळवण्याची आखली रणनीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेनेने युती ताेडून राज्याची सत्ता मिळवल्यामुळे ३० वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने आता शिवसेनेचा 'आत्मा' असणारी मुंबई मनपा २०२२ च्या निवडणुकीत ताब्यात घेण्याचा चंग बांधला अाहे. रविवारी काेअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला.

२०१७ मध्ये भाजप व शिवसेनेने स्वबळावर मुंबई मनपाची निवडणूक लढवली. २२७ पैकी शिवसेनेचे ९३, भाजपचे ८४, काँग्रेसचे २८ व राष्ट्रवादीचे ८ असे सध्याचे बलाबल आहे. देशातील सर्वात श्रीमंत या मनपात १९८५ पासून सेनेची सत्ता आहे. भाजपही त्यांच्यासाेबत युतीत सत्तेत हाेताच. मात्र २०१७ मध्ये भाजपने राज्यातील सत्तेसाठी सेनेला पालिकेत विनाशर्त बाहेरुन पाठिंबा दिला होता. मात्र, अाता युती तुटल्याने शिवसेनेचे हे शक्तीस्थळ ताब्यात घेण्यास भाजप उत्सुक अाहे.

एकहाती सत्ता मिळवण्याची आखली रणनीती

भाजपचे मुंबईत १७ आमदार असून ८३ नगरसेवक आहेत. पुढच्या वेळी पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येईल, अशी आम्ही रणनीती आखली आहे. २२७ वाॅर्ड, ३६ विधानसभा मतदारसंघ आणि ६ लोकसभा मतदारसंघांतील अध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांना दिली.

बातम्या आणखी आहेत...