आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीला आता न्यायालयात आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जाचा वाद शमण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी विराेधकांचे आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांची चाैकशीअंती फेटाळून लावले. मात्र तरीही काँग्रेससह इतर विरोधी पक्षाचे उमेदवार आता या निर्णयाविराेधात हायकाेर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. परवान्याची मुदत संपलेल्या नाेटरीकडून मुख्यमंत्र्यांनी शपथपत्र करवून घेतल्याचा काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, आम आदमी पार्टीचे अमोल हाडके यांचा आक्षेप आहे. निवडणूक प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दबावात वागत असून सर्वच स्तरावर मॅन्युप्युलेशन असल्याचा, बनावट कागदपत्रांचा वापर झाला असल्याचा दावा देशमुख यांनी रविवारी केला. फडणवीस यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळून लावल्याचा निर्णय देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा आदेशातही चुकीची नाेंद हाेती. नोटरींचे नाव व्ही. पी. सोनटके असे असताना आदेशात पुरुषोत्तम नरेंद्र सोनटके असे नाव टाकण्यात आले. त्यावरून पुन्हा वाद झाला. हा प्रकार लक्षात आणून देण्यात आल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यात विवेक पुरुषोत्तम सोनटके अशी सुधारणा करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...