आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी परीक्षा अर्जासाठी आता अखेरची मुदत: विलंब शुल्कासह 10 डिसेंबरपर्यंत संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी अॉनलाइन परीक्षा अर्ज करण्याच्या विहित मुदतीत वाढ केल्यानंतर नियमित शुल्कासह अर्ज करण्याची विहित मुदत संपली असून आता विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १० डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

 

परीक्षेसाठी नियमित प्रविष्ट होणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पूर्वीचे खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ ते १६ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज करण्याची मुदत होती. त्यात वाढ केल्यावर नियमित शुल्कासह २३ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत होती. विलंब शुल्कासह १० डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज करता येईल. माध्यमिक शाळांनी २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहेत. विलंब शुल्क १५ डिसेंबरपर्यंत भरावयाचे आहेत. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (परीक्षा अर्ज) सरल प्रणालीवरून ऑनलाइन पद्धतीने वेळापत्रकाप्रमाणे भरावी, परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत परीक्षा अर्ज करावेत, असे कळविण्यात अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...