आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आपल्याला युवा गोलंदाज तयार करावे लागतील : कर्णधार कोहली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

ख्राईस्टचर्च : आपल्याला युवा वेगवान गोलंदाज तयार करावे लागतील. कारण, ते भविष्यात संघासाठी योगदान देऊ शकतील, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले. २६ वर्षीय जसप्रीत बुमराह पुढील काही वर्षे संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मात्र, ३२ वर्षीय ईशांत व २९ वर्षीय मो. शमी पूर्वीच खेळाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचले आहेत. उमेश यादव यावर्षी ३३ वर्षांचा होईल. कोहलीने म्हटले, हे खेळाडू आता युवा राहणार नाही. त्यामुळे आपल्याला सावध व जागरूक राहावे लागेल. आपल्याकडे त्यांची जागा घेणारे गोलंदाज हवेत.’ ईशांतचे रिहॅब चांगले राहिले नाही, ज्यामुळे त्याच्या टाचेचे दुखणे पुन्हा उद्भवले. गेल्या दोन वर्षांत शमी खूप गोलंदाजी करत आहे. कोहलीने म्हटले, आपण पुढील तीन-चार गोलंदाजांची ओळख करून ठेवली पाहिजे. जे हा दर्जा कायम ठेवू शकतील. अचानक कोणी बाहेर गेल्यावर त्याची कमतरता अापल्याला जाणवू नये. 

सरावाद्वारे अपयशातून कोहली सावरेल : कपिल

कोहलीच्या न्यूझीलंडमध्ये खराब प्रदर्शनामागे रिफ्लॅक्सची कमी असू शकते. त्यामुळे अधिक सराव करण्याची गरज अाहे, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देवने कोहलीला दिला आहे. कपिलने म्हटले, प्रत्येक मोठ्या फलंदाजासोबत असे हाेते. त्याची सवय होण्यासाठी सहा महिने ते एका वर्षाचा वेळ लागतो. मला वाटते कोहलीला नजरे सोबत जुळवून घ्यायला हवे. सेहवाग, द्रविड,  रिचर्डस या सर्वांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. 

बातम्या आणखी आहेत...