आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आता तुम्ही दुकानातून खरेदी करू शकता एक पोतं फेसबुक अन् एक पोतं व्हाॅटस्अॅप 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : एक पोतं फेसबुक दे, एक पोतं व्हॉट्सअॅप दे किंवा एक पोतं ट्विटर दे असे जर धान्य विकणाऱ्या दुकानदाराने म्हटले तर वावगं वाटून घेऊ नका. कारण मार्केट यार्डात सध्या असे बोल ऐकू येत आहेत. जरा व्हाॅट्सअॅप, फेसबुकमधून बाहेर या, असा सल्ला देणाऱ्या मातांच्या किचनमध्ये सोशल मीडियाच्या ब्रँडने थेट स्वयंपाक घराच्या कट्ट्यावर ठाण मांडले आहे.    सोशल मीडियाच्या ब्रँडने स्वयंपाक घराच्या कट्ट्यावर ठाण मांडले  मध्य प्रदेशातील कंपनीने विकसित केले नावीन्यपूर्ण ब्रँड  सोलापूरच्या मार्केट यार्डात नव्या ब्रँडच्या धान्याला मिळतेय पसंती    शरबती गहू, बन्सी गहू, राधिका गहू अशा गव्हाची अनेक नावे तुम्ही आजवर ऐकली असतील. फार तर एखाद्या छोट्या मुलीचे किंवा देव-देवतांचे नाव धान्याला दिले जायचे. मात्र या सर्व नावांना मागे टाकत सध्या महाराष्ट्रासह व संपूर्ण देशात गव्हाची पारंपरिक नावे बाजूला सारत सोशल मीडियाचे ब्रँड नाव असणारे गुगल, फेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि ट्विटर अशा विविध नावांचे गहू सध्या बाजारात मोठ्या जोमात विकले जात आहेत. सोशल मीडियाचे ब्रँड गहू लोकांना खूपच आवडायला लागले आहेत. सोलापुरात या चारही गव्हाच्या प्रकाराला मोठ्या प्रमाणावर मागणी असून सध्या मार्केट यार्डातील प्रत्येक दुकानात या ब्रँडचे गहू पाहायला मिळत आहेत.    व्हॉट्सअॅप गहू लाडका  २५५० ते २६५० या रेंजमध्ये असणाऱ्या गव्हाच्या प्रकारात बहुधा व्हाॅट्सअॅप हा गहू सर्वात कमी किमतीचा आहे. २४ रुपये प्रमाणे हा गहू असून महिलांना या प्रकाराची गुणवत्ता आवडली असून महिला या गव्हाला अधिक प्राधान्य देत आहेत.    या ब्रँड्सची अधिक चलती  रोज नवनवीन धान्य प्रकारे येत असतात. गेल्या वर्षभरापासून गुगल, व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर या प्रवाहाबरोबर नावात बदल केलेल्या मध्य प्रदेशच्या कंपनीने ब्रँड विकसित केलेल्या गव्हाला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बसवेश्वर ईटकळे, अाडत व्यापारी 

0