Home | Business | Business Special | Now you can earn extra money by car pooling soon, government bringing new policy

आता तुम्हाला आपल्या वाहनात प्रवासी बसवून करू शकता कमाई, सरकार घेऊन येत आहे नवीन पॉलिसी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 12, 2019, 03:06 PM IST

निती आयोगाने केली शिफारस, कोणताही परवाना घेण्याची आवश्यकता नाही

 • Now you can earn extra money by car pooling soon, government bringing new policy

  नवी दिल्ली - देशात खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्यसाठी केंद्र सरकार नवीन धोरण अंमलात आणण्याचा विचार करत आहे. निती आयोगाने हे धोरण आखले आहे. खाजगी कारच्या मालकांना विशिष्ट अटींसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे खासगी कारच्या मालकांची कमाई वाढेल.


  अशी आहे निती आयोगाची शिफारस

  निती आयोगाने प्रायव्हेट गाड्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारसमोर व्हीकल पूलिंग (Vehicle Pooling)पॉलिसी सादर केली आहे. याअंतर्गत खासगी कार मालक आपल्या कारमध्ये प्रवासी घेऊ शकतात. पण त्यासाठी त्यांना दिवसभरात तीन किंवा चार फेऱ्या करण्याची परवानगी असेल. या पॉलिसीअंतर्गत राज्य सरकार या खासगी गाड्यांना कॅब किंवी टॅक्सीमध्ये मानणार नाहीत. TOI च्या एका रिपोर्टनुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या खासगी कार मालकांना आपले वाहन राज्यात काम करत असलेले कॅब अॅग्रीगेटरकडे नोंदणी करावी लागेल. ही सेवा घेणाऱ्या खासगी वाहन चालकांना आपल्या प्रवाशांसाठी विमा सुविधा देखील घ्यावी लागणार आहे.


  परिवहन विभाग राज्य सरकारसोबत करत आहे चर्चा

  परिवहन संबंधीत नियम बनवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असते. अशात केंद्र सरकार ही पॉलिसी यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करत आहेत. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या पॉलिसीबाबत अनेक राज्य सरकारसोबत दोन वेळा चर्चा केली आहे.

Trending