आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बाेलले माजी गव्हर्नर; एनपीएवर वेळीच उपाययाेजना केल्या नाही; पटेलांची कबुली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल म्हणाले की, वर्ष २०१४ पर्यंत बँका, सरकार आणि नियामक यांच्या अपयशामुळेच बँकांच्या अनु्त्पादित कर्जाची (एनपीए) समस्या निर्माण झाली. त्यामुळे बँकांचे भांडवल आटले. ही समस्या साेडवण्यासाठी नियामक म्हणून रिझर्व्ह बँकेने अगाेदरच पावले उचलायला हवी हाेती, परंतु ही पावले सावकाश उचलण्यात आली. संपूर्ण बँकिंग क्षेत्राने पूर्वस्थिती प्राप्त करण्यासाठी प्रलाेभनांपासून दूर राहिले पाहिजे, असे माझे मत आहे. बँका गरजेच्या प्रमाणात जास्त कर्ज देत गेल्या आणि सरकारनेही आपले कर्तव्य पूर्णपणे बजावले नाही. रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नरपद भूषवलेले पटेल म्हणाले, देशातील बँकिंग क्षेत्र चिंतेचा विषय आहे. यामध्ये सरकारी बँकांमध्ये फसलेले कर्ज (एनपीए) आणि विद्यमान भांडवल चढवून दाखवण्याचा समावेश आहे. बँका याचा सामना करण्यासाठी सक्षम नाहीत. मे २०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाला त्या वेळी रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हाेते. त्यांच्या कार्यकाळात बँकांनी वितरित केलेल्या कर्जांचे परीक्षण सुरू झाले. यामध्ये अशी अनेक कर्जे आहेत ज्यांची वसुली बँका करू शकत नसल्याचे दिसून आले. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांबाबत ज्या प्रकारे गडबड झाल्याची गाेष्ट समाेर आली ती पाहता एनबीएफसीद्वारे वितरित झालेल्या कर्जांचे वेळाेवेळी परीक्षण झाले पाहिजे. एनपीएच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने इन्साॅल्व्हन्सी अँड बँकरप्सी काेड (आयबीसी) कायदा आणला. रिझर्व्ह बँकेने १२ फेब्रुवारी २०१८ला एक परिपत्रक प्रसिद्ध केले. बँकांमध्ये अडकलेल्या कर्जाची प्रकरणे साेडवण्याचा त्याचा उद्देश हाेता. परंतु यामुळे बँकांच्या कर्ज वितरण क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. 


हा पटेल आणि सरकार यांच्यामधील वादाचा प्रमुख मुद्दा हाेेता. सर्वाेच्च न्यायालयाने यंदाच्या २ एप्रिल राेजी आपल्या निर्णय देताना हे परिपत्रक फेटाळून लावले. यावर मत व्यक्त करताना पटेल म्हणाले, एखादी व्यवस्था किती प्रभावी आहे हे काळच सांगू शकेल. बँकांसाठी एनपीए ही नेहमीच समस्या ठरली आहे. कर्ज वसुलीसाठी बँकांनी जर वेेळेवर निर्णय घेतला नाही तर ही समस्या आक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. 

 

५५ वर्षींय ऊर्जित पटेल यांनी अगाेदरच्या माेदी सरकारबराेबर झालेल्या मतभेदानंतर गेल्या वर्षी १० डिसेंबरला रिझर्व्ह बँक गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला हाेता. ते ४ सप्टेंबर २०१६ ते १० डिसेंबर २०१८ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर हाेते.

बातम्या आणखी आहेत...