आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता खासगी नोकरीतही मिळणार पेंशन, NPS खात्याद्वारे होणार फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- जर तुम्ही खासगी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर आता शासकिय कर्मचाऱ्यांसारखे पेंशन कमवू शकता. यासाठी आपल्याला न्यू पेंशन सिस्टम म्हणजे अकाउंट उघडावे लागेल. अकाउंट उघडण्यासाठी आपले वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. पण 65 वर्षांपेक्षा जास्त असू नये. 

 

ऑनलाइन उघडू शकता अकाउंट
नॅशनल पेंशन सिस्‍टम (NPS) चे अकाउंट आपण ऑनलाइनसुद्धा उघडू शकता. यासाठी एनपीएस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाऊन टिअर 1 आणि टिअर 2 अकाउंट उघडावे लागेल. आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म eNPS पोर्टलद्वारे युझर एनपीएस अकाउंटमध्ये नेट बँकिंग आणि डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे काम करू शकतात. एनपीएस शासनाकडून आयोजित एक रिटायरमेंटनंतर पैसे वाचवण्याचे एक साधन आहे. ज्याचे नियोजन पेंशन फंड रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (PFRDA) करते.

 

ईएनपीएस मधून एनपीएस अकाउंट उघडण्याची ही आहे प्रक्रिया

-अकाउंट उघडण्यासाठी यूजरजवळ मोबाइल नंबर, ई-मेल आणि नेट बँकिंगच्या सुविधेसोबतच बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
-ईएनपीएस पोर्टलनुसार, एनपीएस अकाउंट उघडण्यासाठी अर्जदाराला पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे.
-अर्जदाराला एनपीएस अकाउंट सुरू करण्यासाठी चालू असलेले एनपीएस अकाउंट पीआरएएनला अॅक्टीव्हेट करावे लागेल.
-यूजरला सर्वात आधी ईएनपीएस पोर्टलला नॅशनल पेंशन सिस्टम सेक्शनवर जावे लागेल
-ईएनपीएस पोर्टल रजिस्ट्रेशन आणि रक्कम जमा करण्यासाठी ऑप्शन देते, यासोबत एनपीएस सेक्शन अंतर्गत 2 अकाउंट अॅक्टिवेट करते.
-अॅप्लीकेशनला पुर्ण करण्यासाठी यूजरला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल, आणि तेथे दिलेल्या दोन ऑप्शनमध्ये एक टिअर 1 आणि टअयर 2 अकाउंट आणि टियर 1 अकाउंट निवडावे लागेल.
-आवश्यक माहिती भरल्यानंतर यूजरला आपली स्वाक्षरीचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागेल.


अशी होणार पेमेंट
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यूझरला एनपीएस अकाउंटमध्ये भरना करण्यासाटी गेटवेवर जावे लागेल. ईएनपीएस पोर्टलनुसार, परमानंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) मिळाल्यावर ग्राहकांना 30 दिवसांच्या आत पूर्ण फॉर्म सेंट्रल रिकॉर्डकीपिंग एजंसीला (CRA) पाठवावा लागतो. जर निर्धारित वेळेत ही प्रक्रिया केली नाही, तर आपला ओळख क्रमांक जमा केला जात नाही.


KYC साठी आवश्यक कागदपत्र
पीआरएएन अॅक्टिव्हेशनसाठी केवायसीची गरज असते, जी पीओपीद्वारे मिळते. यासाठी अर्जदाराचे 'नाव' आणि 'पत्ता' पीओपी रिकॉर्डमध्ये असलेल्या नाव आणि पत्त्यासोबत मॅच करावा लागेल. याची संपूर्ण माहिती ईएनपीएस पोर्टलवर उपलब्ध आहे. केवायसीची प्रक्रिया बँकेद्वारे केली जाते. 

बातम्या आणखी आहेत...