आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोरांची भारत साेडण्यास सुरुवात, ३ आठवड्यांत ३०० जण अटकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ गुवाहाटी - आसामसह देशात एनआरसीची प्रक्रिया लागू करणार असल्याच्या हालचाली दिसू लागताच बेकायदा राहणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांनी भारतातील आपला मुक्काम हलवला आहे. घुसखाेरी करू पाहणाऱ्या ३०० जणांना गेल्या तीन आठवड्यांत अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यात सीमेवर घुसखाेरीचा प्रयत्न करणाऱ्या ३०० जणांची धरपकड करण्यात आली. हे सर्व लाेक स्वत:ची बांगलादेशी नागरिक अशी आेळख सांगू लागले आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारे काेणतेही कागदपत्रे नव्हती. बांगलादेशचे वृत्तपत्र द डेली स्टारने बाॅर्डर पाेलिसांच्या हवाल्याने म्हटले की सीमेवर १-१० नाेव्हेंबर दरम्यान एकूण २०४ जणांना अटक केली. त्यात ६७ मुले, ७८ महिला व ६९ पुरूषांचा समावेश आहे. बांगलादेश साेडून चार-पाच वर्षांपासून भारतात आल्याचे या लाेकांनी सांगितले. या काळात कर्नाटकचे बंगळुरू व आसाममध्ये राहिले. आसामनंतर देशभरात एनआरसी यादी तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर घुसखाेरी करून राहणारे लाेकांनी मायदेशी परतण्यास सुरूवात केली आहे. अटक करण्यात आलेले लाेक बांगला भाषिक मुस्लिम आहेत.सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आसाममध्ये एनआरसीचा आढावा घेण्यात आला हाेता. गेल्या पाच वर्षांपासून आसाममध्ये एनआरसीची प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ३.२९ काेटी नागरिकांनी नागरिकत्व पुस्तिकेतील नाेंदणीसाठी अर्ज केला हाेता. आतापर्यंत सरकारचे या प्रक्रियेवर सुमारे १६०० काेटी रुपये खर्च झाले आहेत. ही प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे ५५००० हजार कर्मचारी कार्यरत हाेते. गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल, असे जाहीर केले हाेते. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शनिवारी त्याचे समर्थन केले. देशातील नागरिक व परदेशातील नागरिक काेण? हे जाणून घेण्याचा सरकारला अधिकार असल्याचे राजनाथ यांनी म्हटले हाेते. परंतु, विराेधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत आसाममध्ये ही प्रक्रिया राबवण्यासाठी माेठ्या प्रमाणात पैशांचा चुराडा झाला. तेथील लाेकांचा त्यास विराेध आहे. या दस्तएेवजात ४० लाख लाेकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यात १९.०६ लाख हिंदू लाेकांची नावे वगळली गेल्याचे लक्षात आल्यानंतर गृहमंत्र्यांना धक्का बसल्याचा आराेप काँग्रेसने केला. एवढे असूनही शहा त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हाेट बँक संपुष्टात येणार : शाहनवाज हुसेन

भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) याबद्दल सांगितले की, एनआरसी संपूर्ण देशात लागू हाेणार आहे. देशातील बांगलादेशी घुसखाेरांना बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयाेग हाेऊ शकेल. दुसरीकडे एनआरसी लागू करण्यास काँग्रेससारख्या पक्षांचा विराेध आहे. कारण तसे झाल्यास व्हाेट बँकेचे त्यांचे राजकारण संपुष्टात येणार आहे, असा टाेला हुसैन यांनी लगावला.