आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०२४ मध्ये मते मागण्यास येण्याआधी देशात एनआरसी लागू करणार : शहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चक्रधरपूर/ सिमडेगा - भाजप अध्यक्ष अमित शहा व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी झारखंडमध्ये प्रचारसभा घेतल्या. चक्रधरपूर व बहरागोडामध्ये शहा यांनी सांगितले की, २०२४ मध्ये जेव्हा पुन्हा मते मागण्यास येईन तोपर्यंत देशात एनआरसी लागू झालेले असेल. भाजपच्या नेतृत्वातील सरकार घुसखोरांना निवडून देशातून बाहेर काढेल.


झारखंडमध्ये राहुल गांधीदेखील सभा घेताहेत. ते सतत विचारताहेत की, एनआरसी का आणत आहेत? घुसखोरांना का काढताहेत? ते कोठे जातील? काय खातील? आम्ही विचारतो की भाऊ ते तुमचे चुलत भाऊ आहेत का? आमचे त्यांना आव्हान आहे की, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ५५ वर्षांतील सत्ता आणि आमच्या ५ वर्षांच्या सत्तेचा हिशेब करत मैदानात यावे. आम्ही आग्रह करत न्यायालयात खटला चालवला. मग सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राममंदिर बनवायचा निकाल दिला. लोकांना राममंदिर हवे आहे.भाजप सरकार उद्योगपतींसाठी आदिवासींची जमीन लुटत आहे : राहुल


सिमडेगा येथील सभेत राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी १५-२० उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहेत. मोदी दिवसभर टीव्हीवर येतात. त्यांच्या मार्केटिंगचा पैसा उद्योगपती देतात. या उद्योगपतींचे साडेपाच वर्षात ३.५० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. भाजपची सरकारे आदिवासींची जमीन भांडवलदारांसाठी लुटत आहेत. आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. आम्ही एका वर्षात छत्तीसगडचे रूप बदलले. तेथे आधी भाजप सरकारमध्ये आदिवासींची जमीन हिसकावून उद्योगपतींना दिली जायची. आता असे होत नाही.

भाजपने लावली शक्ती, मोदींच्या सभा; काँग्रेसचे नेतृत्व लांबच


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी झारखंडच्या खुंटी आणि जमशेदपूरमध्ये सभा घेतील. यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या दोन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक, खा. मनोज तिवारी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेतील. पंतप्रधान मोदी सभेसाठी एकवेळ आणि भाजप अध्यक्ष अमित शहा तीन वेळा गेले. तर काँग्रेसचे राहुल गांधी पहिल्यांदाच येथे आले. प्रियंका गांधी यांनी नकार दिला आहे.

पीएमना घुसखोर म्हटल्याने काँग्रेसने माफी मागावी़


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी लोकसभेत एनआरसीवरून जोरदार गांेधळ झाला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी सांगितले की, विरोधी पक्षनेते अधीर रंजन यांनी त्यांच्या वक्तव्यावरून माफी मागायला हवी. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना घुसखोर म्हटले होते. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. सोनिया गांधी घुसखोर आहेत.जर आमचे नेते घुसखोर तर तुमचे नेतेही आहेत : काँग्रेस


लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन यांनी भाजपवर टीका केली. आमच्या नेत्यांना घुसखोर म्हणताहेत. जर आमचे नेते घुसखोर आहेत तर तुमचे नेतेही आहेत. देशातील कोणत्याही नागरिकाचा अधिकार हिरावण्याचा कोणालाच अधिकार नाही. याआधी अधीर रंजन यांनी म्हटले होते की, भारत कोणाची जमीनदारी नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी तुम्ही स्वत: घुसखोर आहात.

बातम्या आणखी आहेत...