आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या दुसऱ्याच दिवशी इटलीला जाणार होता कपल, भयंकर अपघातात दोघांचा मृत्यू; धडक इतकी जोरदार की एअरबॅग फाटले, छत कापून बाहेर काढले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील राजगड येते राहणारा एक कपल रुग्णालयात चेक-अप करून घरी येत होता. त्याचवेळी त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की जोडप्यासह त्यांच्या ड्रायव्हरचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत कार चक्काचूर झाली. अपघाताच्या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पीडितांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तास लागले.


धडक इतकी जोरदार की एअरबॅग उघडल्यानंतरही फाटले
- विक्की (30) आणि तमन्ना (28) यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. ते शुक्रवारी आपल्या इटिओस कारने चालक मोहम्मद रफीकसोबत जयपूरच्या एका रुग्णालयात चेक-अप करण्यासाठी गेले होते. तेथून घरी येत असताना रात्री उशीरा जवळपास 2 वाजता एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर फरार झाले. हा अपघात राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 फोरलेन वर घडला. या ठिकाणी डिव्हायडर सुद्धा नाही.
- अपघातानंतर आवाज इतका जोरदार होता की काही अंतरावर असलेल्या हॉटेल मालक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, धडक इतकी जबरदस्त होती की कारचे एअरबॅग उघडले परंतु उघडाक्षणी फाटले. कारमध्ये तिन्ही मृतदेह अतिशय वाइट पद्धतीने अडकले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी इतर वाहनांना थांबवून मदत घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर एक ट्रक थांबला. त्यातील एका रॉडच्या मदतीने ठोकून आणि जागा बनवून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर कारचे छत कापून उर्वरीत दोन मृतदेह काढण्यात आले. तिन्ही मृतदेह काढण्यासाठी तीन तास लागले.

 

दिवसा खेळली होळी, दुसऱ्या दिवशी इटलीला जाणार होता कपल
विक्कीच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, विक्की गेल्या 10 वर्षांपासून इटलीतील एका हॉटेलात काम करतो. विक्कीसोबत राहून त्याचा भाऊ देखील इटलीतच एका हॉटेलात काम करायचा. दोन महिन्यांपूर्वीच विक्की आपल्या पत्नीसोबत राजस्थानात आला होता. अपघाताच्या दिवशी त्यांनी कुटुंबियांसह रंगांचा पर्व साजरा केला. यानंतर रुग्णालयातून येऊन दुसऱ्या दिवशी इटलीला जाणार होते.